Lokmat Money > बिझनेस न्यूज > नारायण मूर्तींचा हिट फॉर्म्युला! ७० तास काम करून ज्युनिअर इंजिनिअर बनला कोट्यवधींचा मालक

नारायण मूर्तींचा हिट फॉर्म्युला! ७० तास काम करून ज्युनिअर इंजिनिअर बनला कोट्यवधींचा मालक

अनेकदा बराच वेळ काम केल्यानंतर आपण ऑफिसच्या टेबलवरही झोपल्याचं त्यांनी नमूद केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:49 PM2023-11-04T12:49:45+5:302023-11-04T12:50:06+5:30

अनेकदा बराच वेळ काम केल्यानंतर आपण ऑफिसच्या टेबलवरही झोपल्याचं त्यांनी नमूद केलं.

infosys Narayan Murthy s hit formula A junior engineer became the owner of crores by working 70 hours | नारायण मूर्तींचा हिट फॉर्म्युला! ७० तास काम करून ज्युनिअर इंजिनिअर बनला कोट्यवधींचा मालक

नारायण मूर्तींचा हिट फॉर्म्युला! ७० तास काम करून ज्युनिअर इंजिनिअर बनला कोट्यवधींचा मालक

AM Naik Networth: एएम नाईक यांनीही इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या आठवड्यात ७० तास काम करण्याच्या विधानाचं समर्थन केलं आहे. L&T चे मानद अध्यक्ष ए.एम. नाईक यांनी आपणही १५-१५ तास काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेकदा बराच वेळ काम केल्यानंतर आपण ऑफिसच्या टेबलवरही झोपल्याचं त्यांनी नमूद केलं.

नाईक यांनी L&T च्या व्यवसाय मोठा करण्यासाठी ५० वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. यापूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी दर आठवड्याला ७० तास काम करण्याची सूचना केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर काहींनी त्यांचं समर्थनही केलं होतं, तर काहींनी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता.

L&T च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एएम नाईक यांनी कंपनीत ज्युनियर इंजिनीअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९६५ मध्ये L&T मध्ये आपली कारकीर्द सुरू केल्यानंतर, २९ डिसेंबर २००३ रोजी ते L&T चे अध्यक्ष आणि एमडी बनले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १७१ कोटी रुपये होती. २०१२ ते २०१७ पर्यंत ते L&T चे समूह कार्यकारी अध्यक्ष होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी या जबाबदारीपासून स्वत:ला दूर केलं.

रोज १५ तास काम
दरम्यान, आपण रोज १५ तास काम केल्यानंतर केल्यानंतर आपण घरी परतायचो असं नाईक यांनी नमूद केलं. त्यानंतरही L&T बद्दल विचार डोक्यात असायचा. त्यांनी आपली एक आठवण शेअर केली. कॉर्पोरेट अधिग्रहणाच्या लढाईदरम्यान एलअँडटीला वाचवण्यासाठी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी मदत केली होती. त्यांना कोणतीही कंपनी एका व्यावसायिक घराण्याच्या हातात जाऊ द्यायची नव्हती. आपल्या कार्यकाळात अनेक पंतप्रधानांना भेटल्याचे नाईक म्हणाले. काही वेळा L&T मुळे पंतप्रधान आपले सरकार चालू ठेवण्यात यशस्वी झाले होते असा दावाही त्यांनी केला. याबाबत त्यांनी सविस्तर खुलासा केला नाही.

रात्रभराचा प्रवास
सकाळच्या मीटिंगसाठी आपण रात्रभर प्रवास करायचो, असं नाईक यांनी सांगितलं. एका इव्हेंटमध्ये ते म्हणाले, 'आपल्याला संधी मिळेल अशा ठिकाणी कंपनीत जॉईन होण्याचा विचार करत होतो. तसेच, अशी एक कंपनी असावी जी मला राष्ट्रीय उभारणीत मदत करण्यासाठी व्यासपीठ देऊ शकेल. तासनतास काम केल्यावर आपण अनेकदा ऑफिसमध्ये टेबलावर झोपायचो, असं त्यांनी सांगितलं.

Web Title: infosys Narayan Murthy s hit formula A junior engineer became the owner of crores by working 70 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.