Lokmat Money > बिझनेस न्यूज > Narayan Murthy : 'वर्क लाईफ बॅलन्स'च्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत नारायण मूर्ती, सोबतचं केला मोदींचाही उल्लेख

Narayan Murthy : 'वर्क लाईफ बॅलन्स'च्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत नारायण मूर्ती, सोबतचं केला मोदींचाही उल्लेख

Narayan Murthy : भारतीयांनी वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मूर्ती यांनी म्हटलंय. त्यांनी आपल्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:47 PM2024-11-15T12:47:03+5:302024-11-15T12:50:17+5:30

Narayan Murthy : भारतीयांनी वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मूर्ती यांनी म्हटलंय. त्यांनी आपल्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार केला.

infosys Narayan Murthy said firm on work life balance statement working 14 hours he also mentioned pm Modi | Narayan Murthy : 'वर्क लाईफ बॅलन्स'च्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत नारायण मूर्ती, सोबतचं केला मोदींचाही उल्लेख

Narayan Murthy : 'वर्क लाईफ बॅलन्स'च्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत नारायण मूर्ती, सोबतचं केला मोदींचाही उल्लेख

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. भारतीयांनी वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मूर्ती यांनी म्हटलंय. आठवड्यातून सहा दिवसांऐवजी पाच दिवस काम करण्याच्या परंपरेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आपण अजूनही आपल्या जुन्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय.सीएनबीसी ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये नारायण मूर्ती यांनी वर्क लाईफ बॅलन्सनवर विश्वास न करण्याच्या आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. 'जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस'चे स्वतंत्र संचालक आणि नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन केव्ही कामत यांनी एकदा यावर प्रतिक्रिया दिली होती. "भारत हा गरीब देश असून आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे आपल्याला वर्क-लाइफ बॅलन्सपेक्षा त्यांच्याबाबत काळजी करण्याची गरज आहे,' असं कामथ म्हणाले होते.

मोदी प्रचंड मेहनत घेताहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे कॅबिनेट मंत्री आणि इतर कर्मचारी देशासाठी खूप मेहनत घेत आहेत. पंतप्रधान मोदी जेव्हा आठवड्यातून १०० तास काम करत असतात, तेव्हा आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपलं काम आहे, असं मूर्ती म्हणाले.

पाच दिवसांचा आठवडा झाला तेव्हा...

देशात जेव्हा १९८६ मध्ये कामाचा आठवडा सहा ऐवजी पाच दिवसांचा करण्यात आला, तेव्हा आपण निराश झालो, असं मूर्ती म्हणाले. "आपल्याला देशात कठोर मेहनत करण्याची गरज आहे. यासाठी कोणताही पर्याय नाही. भलेही तुम्ही  बुद्धीवान आहेत. तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल. मी माझे विचार मागे  घेणार नाही. मी ते अखेरपर्यत ते सोबत नेणार," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"मी स्वत: सकाळी ६.३० वाजर ऑफिसला जात होतो आणि ८.४० ला परत घरी यायचो. निवृत्त होण्यापूर्व सहाही दिवस१४ तास आणि १० मिनिटं काम करत होतो," असं मूर्ती म्हणाले.

Web Title: infosys Narayan Murthy said firm on work life balance statement working 14 hours he also mentioned pm Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.