Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘इन्फोसिसवर निलेकणी किमान तीन वर्षे हवेत’

‘इन्फोसिसवर निलेकणी किमान तीन वर्षे हवेत’

इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी व्ही. बालकृष्णन यांनी नूतन अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी आपला वारस शोधण्यासाठी दोन-तीन वर्षे पदावर राहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:51 AM2017-08-28T02:51:27+5:302017-08-28T02:52:02+5:30

इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी व्ही. बालकृष्णन यांनी नूतन अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी आपला वारस शोधण्यासाठी दोन-तीन वर्षे पदावर राहून

'Infosys Nilakani for at least three years' | ‘इन्फोसिसवर निलेकणी किमान तीन वर्षे हवेत’

‘इन्फोसिसवर निलेकणी किमान तीन वर्षे हवेत’

नवी दिल्ली : इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी व्ही. बालकृष्णन यांनी नूतन अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी
आपला वारस शोधण्यासाठी दोन-तीन वर्षे पदावर राहून योजना तयार करावी व कंपनीचे प्रयत्न परत अपयशी ठरणार नाहीत अशा व्यावसायिक पद्धतीने होतील, असे बघावे, असे म्हटले.
बालकृष्णन यांनी इन्फोसिसमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाचा दर्जा खालावला असल्याची उघडपणे टीका केलेली आहे. त्यांनी सहअध्यक्ष असलेले व नंतर स्वतंत्र संचालक बनलेले रवी वेंकटेशन यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी पुन्हा एकदा केली आहे. २०१४ मध्ये व्यावसायिक मंडळाकडून कंपनी चालवली जात असताना मुख्य कार्यकारी अधिकारी संस्थापकांची जागा घेतो, का तर मंडळाने चांगले काम केलेले नाही म्हणून, परंतु हा प्रयोग फसला. मात्र हा मोठाच अनुभव होता. त्यामुळे प्रयोग पुन्हा एकदा अपयशी ठरायला नको, असे बालकृष्णन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

Web Title: 'Infosys Nilakani for at least three years'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.