नवी दिल्ली : इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी व्ही. बालकृष्णन यांनी नूतन अध्यक्ष नंदन निलेकणी यांनीआपला वारस शोधण्यासाठी दोन-तीन वर्षे पदावर राहून योजना तयार करावी व कंपनीचे प्रयत्न परत अपयशी ठरणार नाहीत अशा व्यावसायिक पद्धतीने होतील, असे बघावे, असे म्हटले.बालकृष्णन यांनी इन्फोसिसमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाचा दर्जा खालावला असल्याची उघडपणे टीका केलेली आहे. त्यांनी सहअध्यक्ष असलेले व नंतर स्वतंत्र संचालक बनलेले रवी वेंकटेशन यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी पुन्हा एकदा केली आहे. २०१४ मध्ये व्यावसायिक मंडळाकडून कंपनी चालवली जात असताना मुख्य कार्यकारी अधिकारी संस्थापकांची जागा घेतो, का तर मंडळाने चांगले काम केलेले नाही म्हणून, परंतु हा प्रयोग फसला. मात्र हा मोठाच अनुभव होता. त्यामुळे प्रयोग पुन्हा एकदा अपयशी ठरायला नको, असे बालकृष्णन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
‘इन्फोसिसवर निलेकणी किमान तीन वर्षे हवेत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 2:51 AM