Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगात भारी! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'या' भारतीय कंपनीची फोर्ब्सच्या यादीत भरारी

जगात भारी! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'या' भारतीय कंपनीची फोर्ब्सच्या यादीत भरारी

फोर्ब्सच्या यादीत भारतातील १७ कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:57 AM2019-09-25T02:57:16+5:302019-09-25T07:07:57+5:30

फोर्ब्सच्या यादीत भारतातील १७ कंपन्या

Infosys ranks third among 100 best companies | जगात भारी! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'या' भारतीय कंपनीची फोर्ब्सच्या यादीत भरारी

जगात भारी! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'या' भारतीय कंपनीची फोर्ब्सच्या यादीत भरारी

नवी दिल्ली : फोर्ब्सने जगातील प्रतिष्ठीत कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली असून यातील पहिल्या पाच प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये इन्फोसिस या भारतीय कंपनीचा क्रमांक लागला आहे. इन्फोसिस ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. पहिल्या क्रमांकावर कंपनी ‘व्हिसा’ या बँकिंग क्षेत्रातील कंपनी, तर दुसऱ्या क्रमांकावर ‘फेरारी’या ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी आहे. फोर्ब्सच्या यंदाच्या यादीत भारतातील तब्बल १७ कंपन्यांचा समावेश आहे.

भारतातील १७ उत्कृष्ट कंपन्यांमध्ये टीसीएस व एचडीएफसी यांचा समावेश आहे. जगातील उत्कृष्ट १0 कंपन्यांमध्ये नेटफ्लिक्स, मायक्रोसॉफ्ट, टोयोटा, मास्टर कार्ड, पेपल, वॉल्ड डिस्ने, व कॉस्ट्को यांचा समावेश झाला आहे. भारतातील टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी)ने ३५ व्या स्थानावरून २२ व्या क्रमांकावर झेप घेतली. नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक असून, नंदन निलकेणी हेही संस्थापक सदस्य आहेत. सध्या सलिल पारेख हे कंपनीचे सीईओ आहेत. फोर्ब्सने जगातील २००० मोठ्या, उत्कृष्ट कंपन्यांची यादी तयार करताना त्यांची विश्वासार्हता, उत्पादने, सेवाक्षमता, कंपनीच्या व्यवस्थापन वा मालकांची निष्पक्षता असे अनेक निकष लावले होते. यासाठी फोबर्सने जगभरातील १५ हजारांहून अधिक कंपन्यांचा अभ्यास केला होता. गेल्या वर्षीच्या यादीत भारतातील १२ कंपन्या होत्या.

Web Title: Infosys ranks third among 100 best companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.