Lokmat Money > बिझनेस न्यूज > इन्फोसिस करणार १0 हजार अमेरिकी कर्मचाऱ्यांची भरती

इन्फोसिस करणार १0 हजार अमेरिकी कर्मचाऱ्यांची भरती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसाचे नियम कडक करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत

By admin | Published: May 3, 2017 12:54 AM2017-05-03T00:54:45+5:302017-05-03T00:54:45+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसाचे नियम कडक करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत

Infosys recruits 10 thousand American employees | इन्फोसिस करणार १0 हजार अमेरिकी कर्मचाऱ्यांची भरती

इन्फोसिस करणार १0 हजार अमेरिकी कर्मचाऱ्यांची भरती

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसाचे नियम कडक करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. भारतातील एक आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस अमेरिकेत उभारणार असलेल्या चार ‘टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन हब’साठी तब्बल १0 हजार अमेरिकी कामगारांची भरती करणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिक शिकवणी, वापर अनुभव आणि क्लाऊड व बीग डाटा यासारख्या नव्या तंत्रज्ञान क्षेत्रावर इन्फोसिस लक्ष केंद्रित करणार आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांनी दिली. सिक्का यांनी सांगितले की, यापैकी पहिले हब इंडियानामध्ये आॅगस्टपर्यंत उभे राहील. त्यात २0२१ पर्यंत अमेरिकी नागरिकांसाठी २ हजार रोजगार उपलब्ध होतील. उरलेल्या तीन प्रकल्पांची स्थळे येत्या काही महिन्यांत ठरविण्यात येतील. या प्रकल्पांत लोकांना तंत्रज्ञान आणि संशोधनाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याच प्रमाणे वित्तीय सेवा, वस्तू उत्पादन, आरोग्य सेवा, किरकोळ विक्री आणि ऊर्जा या क्षेत्रात ग्राहकांसोबत कसे काम करावे हेही शिकविले जाईल.
उत्तर अमेरिकेत इन्फोसिसची ६0 टक्के बाजारपेठ आहे. २0१६-१७ या वर्षात येथून कंपनीला १0.२ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला.
सिक्का म्हणाले की, अमेरिकेने व्हिसा नियम बदलले म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे नव्हे. गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आभासी वास्तवता यासारखे नवीन तंत्रज्ञान येत आहे. पारंपरिक प्रकल्पही मोठ्या प्रमाणात स्वयंचलित होत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आणि स्थानिक बुद्धिमत्तेची योग्य सांगड घालणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे कंपनीने आधीच बदल सुरू केले आहेत.

उत्तर अमेरिकेत इन्फोसिसची ६0 टक्के बाजारपेठ आहे. २0१६-१७ या वर्षात येथून कंपनीला १0.२ अब्ज डॉलरचा महसूल मिळाला.

Web Title: Infosys recruits 10 thousand American employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.