नवी दिल्ली, दि. 11 - देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेली इन्फोसिस वर्षाला 6 हजार अभियंत्यांची भरती करणार आहे. इन्फोसिसचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक यू. बी. प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षातही कंपनीनं एवढ्याच प्रमाणात अभियंत्यांची भरती केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. इन्फोसिस अमेरिका आणि युरोपमध्ये अभियंत्यांच्या नियुक्तीला मोठ्या प्रमाणात चालना देणार आहे. दोन वर्षांत गेल्या वर्षाइतक्याच नियुक्त्या करण्याचे आमचे ध्येय आहे. मात्र हे बाजाराच्या परिस्थितीवर निर्भर असेल, असंही राव म्हणाले होते. कंपनीनं व्हिसासंबंधित मुद्द्यांमुळे अमेरिका आणि यूरोपात नियुक्त्या वाढवण्यावर भर दिला आहे. गेल्या आठवड्यात इन्फोसिसचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक यू. बी. प्रवीण राव यांनी मागच्या आठवड्यात गुंतवणूकदारांची बैठक घेतली होती. आमच्या नियुक्त्या जारी राहतील. त्यामुळेच आम्ही 6 हजार नियुक्त्यांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मात्र पुढच्या दोन वर्षांतही एवढ्याच लोकांच्या नियुक्त्या करण्याचा आमचा इरादा असेल.
मात्र त्या नियुक्त्या बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असतील. बंगळुरूतील एक कंपनी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. कंपनीचे संस्थापक आणि माजी संचालक मंडळ यांच्या अनियमिततेवर मतभेद आहेत. त्यामुळेच कंपनीचे तत्काली मुख्य कार्यपालक अधिकारी विशाल सिक्का यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. कंपनीचे सह-संस्थापक नंदन निलकेणी यांना त्यांच्या अनुपस्थितीत अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. सिक्का यांच्या जाण्यानंतर राव यांनी हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे.