Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक घोटाळे रोखण्यासाठी इन्फोसिसचे विशेष नेटवर्क

बँक घोटाळे रोखण्यासाठी इन्फोसिसचे विशेष नेटवर्क

नीरव मोदीसारखे बँक घोटाळे रोखण्यासाठी विख्यात आयटी कंपनी इन्फोसिसने व्यापारी कर्जासाठी ब्लॉक-चेन तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क आणले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:54 PM2018-05-17T23:54:08+5:302018-05-17T23:54:08+5:30

नीरव मोदीसारखे बँक घोटाळे रोखण्यासाठी विख्यात आयटी कंपनी इन्फोसिसने व्यापारी कर्जासाठी ब्लॉक-चेन तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क आणले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

Infosys Special Networks to Prevent Bank Scams | बँक घोटाळे रोखण्यासाठी इन्फोसिसचे विशेष नेटवर्क

बँक घोटाळे रोखण्यासाठी इन्फोसिसचे विशेष नेटवर्क

मुंबई : नीरव मोदीसारखे बँक घोटाळे रोखण्यासाठी विख्यात आयटी कंपनी इन्फोसिसने व्यापारी कर्जासाठी ब्लॉक-चेन तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क आणले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली.
देशातील बहुतेक बँका कॉम्प्युुटरमध्ये आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी इन्फोसिसचे ‘फिनॅकल’ नावाचे सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअरच्या जोडीला आता ब्लॉक-चेन नेटवर्क आले आहे. हे नवे नेटवर्क भारतातील सात बँकांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला उघडकीस आलेल्या १२,७०० कोटींच्या नीरव मोदी व ६,४०० कोटींच्या मेहुल चोकसी घोटाळ्यात या हिरे व्यापाऱ्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाºयांच्या संगनमताने प्रचंड मोठ्या रकमांच्या लेटर्स आॅफ अंडरस्टँडिंग (एलओयू)द्वारे जवळपास १९,१०० कोटी रुपयांची रक्कम लंपास केली होती. या घोटाळ्यात बँक अधिकारी / कर्मचाºयांनी या एलओयूची नोंद बँकेच्या कॉम्प्युटरमध्ये केली नव्हती. त्यामुळे २०११ ते २०१७ अशी सहा वर्षे हे घोटाळे उघड झाले नव्हते. इन्फोसिसच्या नव्या ब्लॉक-चेन नेटवर्कमध्ये अशा घोटाळ्यांना वेळीच चाप बसणार आहे. इन्फोसिसचे हे नेटवर्क सध्या आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, येस बँक, इंड्सइंड बँक, आरबीएल बँक व साऊथ इंडियन बँक अशा सात बँका वापरत आहेत.
>व्यवहारांची सर्व टप्प्यांवर होणार नोंद
ब्लॉक-चेन प्रणालीमुळे प्रत्येक आर्थिक व्यवहार किती टप्प्यांमध्ये नोंदला गेला आहे याची माहिती नेटवर्कने जोडलेल्या सर्व सदस्यांना/बँकांना उपलब्ध होते.
इन्फोसिसच्या या नेटवर्कमुळे माल खरेदी करणारा व्यापारी, त्याची बँक, माल विकणारा व्यापारी व त्याची बँक या सर्वांना प्रत्येक आर्थिक व्यवहार कॉम्प्युटर नेटवर्कवर उपलब्ध होतो.
सर्व माहिती पारदर्शकपणे सर्व नेटवर्क सदस्यांपर्यंत पोहोचल्याने आर्थिक घोटाळा करण्याची शक्यता संपुष्टात येते.
19000 कोटींचा घोटाळा 6 वर्षांत
उघडकीस
व्यवहाराच्या नोंदी दडवून बँकेला ठेवले होते अंधारात

Web Title: Infosys Special Networks to Prevent Bank Scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.