मुंबईः देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लावल्यानंतर आज सकाळी शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत 45 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. जर कोणाकडे आधीपासूनच विकत घेतलेले शेअर्स असल्यास त्यांनी ते विकू नयेत. तसेच या काळात कोणतीही नवी गुंतवणूक करू नका. रिपोर्टनुसार, इन्फोसिसनं नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अनैतिक पावलं उचलली आहेत. या प्रकरणी एका ग्रुपनं इन्फोसिस बोर्डाला पत्र लिहून माहिती दिली आहे. चौकशीसाठी तयार इन्फोसिस- सप्टेंबरमध्ये व्हिसलब्लोअरकडून दोन तक्रारी मिळाल्या. शार्दुल अमरचंद मंगलदास प्रकरणात व्हिसलब्लोअर (Whistleblower) च्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे, असंही इन्फोसिसनं सांगितलं आहे.
इन्फोसिसला 6 वर्षांतील सर्वात मोठा झटका, काही मिनिटांत बुडाले 45 हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:12 PM