LIC Appoints Infosys : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत आहे. यासाठी कंपनीने देशातील आघाडीची आयटी कंपनी Infosys सोबत हातमिळवणी केली आहे. आता एलआयसीचे ग्राहक बँकांच्या डिजिटल सेवांप्रमाणे एलआयसीच्या डिजिटल सेवा वापरू शकतील. आतापर्यंत एलआयसीच्या ग्राहकांना विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी होम ब्रँचमध्ये जावे लागायचे. याउलट, बँकेचे ग्राहक देशातील कोणत्याही शाखेत जाऊन विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. यासाठी होम ब्रँचमध्ये जाण्याची गरज नाही.
इन्फोसिस देशातील अनेक बँका आणि इतर संस्थांना आपली सेवा पुरवते. Infosys चे SaaS (सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस) सॉफ्टवेअर अनेक बँकांद्वारे वापरले जाते. तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्याही इन्फोसिसने विकसित केलेले सॉफ्टवेअर वापरतात. याशिवाय, इन्फोसिस सॉफ्टवेअरचा वापर आरोग्यसेवा, लॉजिस्टिक आणि उत्पादन यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. एलआयसीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
इन्फोसिस LIC साठी काय करेल?LIC ने DIVE (डिजिटल इनोव्हेशन अँड व्हॅल्यू एन्हांसमेंट) नावाचा डिजिटल परिवर्तन कार्यक्रम सुरू केला आहे. LIC ने DIVE प्लॅटफॉर्म वापरून आपल्या ग्राहकांना, फील्ड फोर्सेस, भागीदारांना आणि कर्मचाऱ्यांना नवीन अनुभव देण्याची योजना आखली आहे. LIC ने आपले नवीन आणि अत्याधुनिक NextGen डिजिटल प्लॅटफॉर्म DIVE तयार करण्यासाठी इन्फोसिसची निवड केली आहे. हे डिजिटल प्लॅटफॉर्म मॉड्यूलर, अॅक्सेसेबल आणि क्लाउड नेटिव्ह असेल.
कोणत्या सुविधा उपलब्ध होणार हे प्लॅटफॉर्म एलआयसीसाठी कस्टमर अँड सेल्स सुपर अॅप, पोर्टल आणि डिजिटल ब्रांचसारख्या हाय व्हॅल्यू बिझनेस अॅप्लिकेशन्सच्या निर्मितीचा पाया घालेल.कस्टमरना इंटीग्रेटेड एंड-टू-एंड डिजिटल इंश्योरेन्ससह अनेक सेवा मिळतील.या प्लॅटफॉर्मद्वारे ब्रांच कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल फ्रंट-एंड प्लॅटफॉर्मची सुविधा मिळेल.
नवीन तंत्रज्ञान वापरण्यावर जोरयाबाबत एलआयसीचे सीईओ आणि एमडी सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, LIC ने ग्राहकांना जागतिक दर्जाच्या डिजिटल सुविधा पुरवण्यासाठी इन्फोसिससोबत भागीदारी केली आहे.