नवी दिल्ली - कोरोना विषाणू्च्या संकटकाळात कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक रक्कम यावी यासाठी केंद्र सरकारने पीएफ संदर्भात मोठी घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देताना मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांसाठी कर्मचारीभविष्य निर्वाह निधीमधील (ईपीएफ) योगदानात चार टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सरकारने दिलेल्या या सवलतीची मुदत आता संपत असून, ऑगस्ट महिन्यापासून कर्मचारी आणि कंपनीला पगारातील १२-१२ टक्के रक्कम पीएफसाठी द्यावी लागेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती आता पूर्वीप्रमाणेच पगार येणार आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी ईपीएफ योगदानामध्ये तीन महिन्यांपर्यंत ४ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुमारे साडे सहा लाख कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पगारात अधिकची वाढीव रक्कम मिळाली होती. नियमानुसार कर्मचारी आमि कंपनीलामिळून कर्मचाऱ्याचा बेसिक पगारआणि डीएच्या एकूण १२-१२ टक्के म्हणजेच २४ टक्के रक्कम दरमहा पीएफमधील योगदान म्हणून जमा करावी लागते. मात्र वित्तमंत्र्यांच्या घोषणेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पीएफ योगदानात एकूण चार टक्के सवलत मिळाली होती. यातील दोन टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या योगदानातून आणि दोन टक्के रक्कम संस्थेच्या योगदानातून वजा करण्यात आली होती.
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या इनहँड पगारामध्ये गेले तीन महिने बेसिक +डीएच्या चार टक्के वाढ मिळाली. तर केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि राज्यांच्या पीएसयूच्या कर्मचाऱ्यांना नियोक्त्यांनी आपले १२ टक्के पूर्ण योगदान दिले. तर कर्मचाऱ्यांकडून १० टक्के योगदान दिले गेले. मात्र आता ऑगस्टपासून कर्मचारी आणि नियोक्त्यांना पूर्वीप्रमाणे ईपीएफमध्ये योगदान द्यावे लागेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच पगार मिळेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल