Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पहल’ योजना गिनीज बुकमध्ये

‘पहल’ योजना गिनीज बुकमध्ये

विविध प्रकारची अनुदाने थेट बँक खात्यात जमा करण्याच्या तेल व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवहारांची वाढती संख्या आणि त्याची गती या मुद्यावर

By admin | Published: August 20, 2015 11:00 PM2015-08-20T23:00:18+5:302015-08-21T00:16:22+5:30

विविध प्रकारची अनुदाने थेट बँक खात्यात जमा करण्याच्या तेल व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवहारांची वाढती संख्या आणि त्याची गती या मुद्यावर

'Initiative' scheme in Guinness Book | ‘पहल’ योजना गिनीज बुकमध्ये

‘पहल’ योजना गिनीज बुकमध्ये

मुंबई : विविध प्रकारची अनुदाने थेट बँक खात्यात जमा करण्याच्या तेल व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवहारांची वाढती संख्या आणि त्याची गती या मुद्यावर या कंपन्यांचे नाव आता गिनीज बुकमध्ये नोंदले गेले आहे. ‘प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ’ (पहल) असे या योजनेचे नामकरण करण्यात आले असून अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याच हा जगातील सर्वात मोठा यशस्वी प्रयोग ठरला आहे.
या विक्रमीच गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी याकरिता इंडियन आॅईल कंपनीने एक अर्ज गिनीज बुक व्यवस्थापनाकडे केला होता. तसेच, आपल्या दाव्याच्या पुष्ठर्थ्य आकडेवारीदेखील सादर केली. अशा प्रकारची योजना राबविणाऱ्या देशांतील आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर आणि त्यानंतर भारतातील दाव्याची सत्यता पटल्यानंतर हा या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Initiative' scheme in Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.