Join us

राज्यात १२ महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन सेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:14 AM

स्टार्टअप इंडिया योजनेला विविध स्तरातून प्रतिसाद मिळत असतानाच राज्यात एकूण १२ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन अ‍ॅण्ड इन्क्युबेशन सेल उभारण्यात येणार आहेत.

मुंबई : देशातील तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे वळावे या उद्देशाने देशात सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया योजनेला विविध स्तरातून प्रतिसाद मिळत असतानाच राज्यात एकूण १२ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन अ‍ॅण्ड इन्क्युबेशन सेल उभारण्यात येणार आहेत. या सेलच्या माध्यमातून उद्याचे उद्योजक घडविण्याचा सरकारचा मानस आहे. यातील सहा सेल मुंबईच्या महाविद्यालयात असतील तर ठाणे व नवी मुंबईतील महाविद्यालयांत प्रत्येकी एक सेल असेल. तसेच अनेक वर्षांनंतर राज्यातील वाशिम, नंदुरबार जिल्ह्यांत दोन सरकारी मॉडेल महाविद्यालये उभी राहतील. सर्व कक्षांचे अधिकृत उद्घाटन, कोनशिला समारंभ जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटली होणार आहे.