नवी दिल्ली : जाहिरातीच्या उद्योगावर लक्ष असलेल्या एएससीआयने आयडिया सेल्युलर, डाबर, ग्लाक्सोस्मिथक्लाईन व हेइंजसारख्या कंपन्यांच्या १२५ जाहिराती भ्रामक असल्याचे ठरविले आहे. या जाहिराती यावर्षी फेब्रुवारीमधील आहेत.
अॅडव्हरटायझिंग स्टँडर्ड कौन्सिल आॅफ इंडियाच्या ग्राहक तक्रार परिषदेकडे फेब्रुवारीमध्ये १६७ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ७३ तक्रारी या वैयक्तिक आणि आरोग्याशी संबंधित भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिरातींबद्दल होत्या व तक्रारी खऱ्याही होत्या.
परिषदेने आयडिया सेल्युलरच्या जाहिरातीविरुद्ध आलेली तक्रार योग्य ठरविली. या तक्रारीत हरियाणातील मुलींना शिकण्यासाठी घराबाहेर जाऊ न देण्याची प्रथा दाखविण्यात आली होती. त्यामुळे हरियाणाची प्रतिमा काळवंडली. याच प्रकारे हेइंज इंडियाच्या ग्लुकॉन डी व्होल्ट जाहिरातीमध्ये लहान मुले गोळी हवेत उडी मारून थेट तोंडात पकडताना दाखविले, असे करणे धोकादायक आहे.
कारण मुलांना तसे करून बघण्याचा मोह पडू शकतो. हॉर्लिक्सच्या जाहिरातीत परीक्षेच्या काळात हॉर्लिक्स घेतल्यास एकाग्रता वाढते, असे दाखविण्यात आले आहे. डाबरच्या जाहिरातीमध्ये डाबर च्यवनप्राश प्रतिकारशक्ती तीनपट करते व मुले आतून मजबूत होतात, असे दाखविले आहे.
१२५ जाहिराती भ्रामक असल्याचे चौकशीत स्पष्ट
जाहिरातीच्या उद्योगावर लक्ष असलेल्या एएससीआयने आयडिया सेल्युलर, डाबर, ग्लाक्सोस्मिथक्लाईन व हेइंजसारख्या कंपन्यांच्या १२५ जाहिराती भ्रामक
By admin | Published: April 25, 2015 12:47 AM2015-04-25T00:47:25+5:302015-04-25T00:47:25+5:30