Lokmat Money > बिझनेस न्यूज > मृतांच्या नावांचे शेअर्स विकणाºयांची चौकशी, एजंटांचे रॅकेट होईल उघड

मृतांच्या नावांचे शेअर्स विकणाºयांची चौकशी, एजंटांचे रॅकेट होईल उघड

मुंबई : मृत व्यक्तींच्या दावा न केलेल्या (अनक्लेम्ड) समभागांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणा-या घोटाळेबाज एजंटांची सेबीने चौकशी सुरू केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:10 AM2017-10-25T04:10:26+5:302017-10-25T04:10:34+5:30

मुंबई : मृत व्यक्तींच्या दावा न केलेल्या (अनक्लेम्ड) समभागांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणा-या घोटाळेबाज एजंटांची सेबीने चौकशी सुरू केली आहे.

Inquiries of selling shares in the names of deceased, the agent's racket will be revealed | मृतांच्या नावांचे शेअर्स विकणाºयांची चौकशी, एजंटांचे रॅकेट होईल उघड

मृतांच्या नावांचे शेअर्स विकणाºयांची चौकशी, एजंटांचे रॅकेट होईल उघड

मुंबई : मृत व्यक्तींच्या दावा न केलेल्या (अनक्लेम्ड) समभागांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणा-या घोटाळेबाज एजंटांची सेबीने चौकशी सुरू केली आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात मोठे रॅकेट काम करीत असण्याची शक्यता आहे. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. समभाग हस्तांतरण संस्था, कंपन्या, बँका आणि काही सरकारी कार्यालयांतील लोक या घोटाळ्यात सहभागी आहेत. काही प्रकरणांत डीमॅट खात्यांतूनही समभाग विकण्यात आले आहेत.
एका उच्चस्तरीय वित्त व्यावसायिकाने सेबीकडे केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार व्यावसायिकाचे एक नातेवाईक जोडपे काही दशकांपूर्वी अमेरिकेत मरण पावले. त्यांचे भारतातील दोन कंपन्यांत समभाग होते. हे समभाग भामट्यांनी बनावट खात्यात हस्तांतरित केले. नंतर ते विकून २३ लाख रुपये लंपास केले. मयत व्यक्तींच्या नावे खोटी खाती उघडून हा व्यवहार पार पाडण्यात आला. या तक्रारीनंतर दोन्ही कंपन्यांनी चौकशी केली, तेव्हा अशा प्रकारच्या २0 घटना उघडकीस आल्या.
सूत्रांनी सांगितले की, या बनवेगिरीचा व्याप खूप मोठा असू शकतो. त्यात अनके लोक गुंतलेले असू शकतात. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊनच सेबीने चौकशी
सुरू केली आहे. कोट्यवधी
रुपयांचा घोटाळा त्यातून उघडकीस येऊ शकतो.
सध्याच्या नियमानुसार मृत व्यक्तीच्या नावावरील समभाग वारसांच्या नावावर करण्यासाठी न्यायालयाने प्रमाणित केलेले वारस प्रमाणपत्र लागते. त्यामुळे घोटाळेबाजांनी थेट मृतांच्या नावेच सर्व व्यवहार केले आहेत.
>असा होतो बनावट व्यवहार
मृत व्यक्तीचे नाव आणि सही कंपनी निबंधकांच्या कार्यालयातून गैरमार्गाने मिळविण्यात येते.
बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तींचे मतदान कार्ड व पॅन कार्ड बनविण्यात येतात. त्याआधारे बँक खाते, तसेच डीमॅट खाते उघडण्यात येते.
समभाग प्रमाणपत्र हरवल्याचा बहाणा करून कंपनीच्या समभाग हस्तांतरण एजंटांकडे प्रमाणपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मागण्यात येतात.
प्रती मिळाल्या की, समभाग डीमॅट खात्यात हस्तांतरित करण्यात येतात. त्यानंतर ते विकून टाकण्यात येतात.
समभाग विकून आलेला पैसा याच कामासाठी उघडण्यात आलेल्या बनावट खात्यात हस्तांतरित केला जातो. या खात्यांतून थोडे-थोडे करून रोखीने पैसे काढून घेतले जातात. त्यामुळे घोटाळेबाजांचा माग राहात नाही.

Web Title: Inquiries of selling shares in the names of deceased, the agent's racket will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.