नवी दिल्ली : आगामी वित्त वर्षांपर्यंत शेअर बाजारात इन्स्टंट सेटलमेंट व्यवस्था लागू करण्यात येईल, अशी माहिती भांडवली बाजार नियामक सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी दिली आहे.
माधबी पुरी बुच यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, सेबीने शेअर बाजारातील व्यवहारांच्या सेटलमेंटचा कालावधी कमी करून एक दिवसावर आणला आहे. मात्र, तो आणखी कमी करण्यासाठी सेबी प्रयत्नशील आहे. आता तत्काळ सेटलमेंट फार दूर नाही. आम्ही त्यावर काम करीत आहोत.
बुच यांनी सांगितले की, सेबीने दुय्यम बाजार व्यवहारांसाठी एएसबीए यंत्रणा नुकतीच लागू केली. ही यंत्रणा नक्की यशस्वी होईल, याचा मला विश्वास आहे. पुढचे पाऊल तत्काळ सेटलमेंटचे असेल. तत्काळ सेटलमेंट व्यवस्था चालू वित्त वर्षात कार्यरत होईल का, याची खात्री देता येत नाही. मात्र, पुढील वित्त वर्षापर्यंत ती निश्चितच कार्यरत होईल.