नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटमध्ये पुन्हा एकदा त्रुटी येत असून, ‘सर्च’ फिचर बंद पडले आहे. यामुळे ई-फायलिंग पोर्टलमधील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसला विभागाने दिले आहेत.
अनेक युजर्सनी प्राप्तिकर विभागाचे पोर्टल वापरताना समस्या निर्माण झाल्याची तक्रार केली आहे. पोर्टलच्या शुभारंभाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ही बाब समोर आली आहे. नवीन ई-फायलिंग संकेतस्थळ www.incometax.gov.in ७ जून 2021 रोजी सुरू करण्यात आले. सुरुवातीला, पोर्टलवर टॅक्स रिटर्न आणि इतर फॉर्म सबमिट करण्यात करदाते आणि व्यावसायिकांना अनेक अडचणी येत होत्या.
यामुळे सरकारला करदात्यांना टॅक्स रिटर्न आणि इतर संबंधित फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवावी लागली. पोर्टल विकसित करण्याची जबाबदारी २०१९ मध्ये इन्फोसिसला देण्यात आली होती.