Lokmat Money > बिझनेस न्यूज > आॅनलाइन खरेदीमुळे विमा स्वस्त

आॅनलाइन खरेदीमुळे विमा स्वस्त

सध्या विमा कंपन्यांच्या काही ठरावीक उत्पादनांची विक्री आॅनलाइन पद्धतीने होते,

By admin | Published: June 10, 2016 06:42 AM2016-06-10T06:42:55+5:302016-06-10T06:42:55+5:30

सध्या विमा कंपन्यांच्या काही ठरावीक उत्पादनांची विक्री आॅनलाइन पद्धतीने होते,

Insurance is cheap because of online shopping | आॅनलाइन खरेदीमुळे विमा स्वस्त

आॅनलाइन खरेदीमुळे विमा स्वस्त


मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारांच्या व्यवहारासाठी ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेत आणि विशेषत: इंटरनेटवरून आर्थिक व्यवहारांसाठी भारतीय ग्राहकांत निर्माण झालेल्या जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर आता विमा उद्योगही आॅनलाइन जाण्याच्या तयारीत आहे, तसेच विमा कंपन्यांनी स्वत:च्या वेबसाइटसोबतच ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातूनही विविध उत्पादनांची विक्री करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या विमा कंपन्यांच्या काही ठरावीक उत्पादनांची विक्री आॅनलाइन पद्धतीने होते, पण ही प्रक्रिया मर्यादित आणि ठरावीक योजनांपुरतीच मर्यादिच आहे.
विमा उत्पादनांच्या आॅनलाइन विक्रीचा एक प्रस्ताव विमा नियामक प्राधिकरणाने तयार केला असून, यानुसार ग्राहकांना विम्याची उत्पादने आॅनलाइन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. विमा उत्पादनांच्या विक्रीमध्ये विमा कंपन्या, विमा एजंट अशा विमा विक्रीतील सर्वच घटकांचा समावेश आहे. याकरिता, इरडाने स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. या नियमावलीच्या अंतर्गत विमा कंपन्या आणि विमा एजंटना आॅनलाइन प्लॅटफॉर्म विकसित करून विमा उत्पादनांची खरेदी करावी लागेल, तसेच या माध्यमातून होणाऱ्या सर्व योजनांच्या विक्रीची, तसेच त्या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही सर्वस्वी विमा
कंपन्यांची असेल, असेही इरडाने स्पष्ट केले आहे.
सध्या म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीच्या काही प्रमुख योजनांची विक्री इंटरनेटच्या माध्यमातून होते. त्यासाठी गुंतवणूकदारांना स्वत:च्या आॅनलाइन ओळखीची पडताळणीही करून घ्यावी लागते, तसेच ‘नो युअर कस्टमर’ अर्थात, ‘केवायसी’ची प्रक्रिया पार पाडावी लागते, तसेच या व्यवहारांसाठी ‘डिजिटल सिग्नेचर’ देखील करून घ्यावी लागते. याच धर्तीवर विमा कंपन्यांनी इंटरनेटवरील आपल्या विक्रीसाठी रचना करणे अपेक्षित असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
विम्याच्या प्रीमियमची किंमत घटणार
विमा उत्पादनांची विक्री करण्यासाठी आॅनलाइन प्लॅटफॉर्मची उभारणी झाल्यास यामुळे विम्याच्या प्रीमियमच्या किमतीमध्ये कमाल
35
टक्क्यांपर्यंत घट होणार असल्याचे मानले जाते.
याचे कारण म्हणजे, विमा कंपनीच्या वेबसाइटवरून जे लोक थेट विम्याच्या उत्पादनांची खरेदी करतील, त्यांना एजंटच्या कमिशन आणि विमा प्रक्रिया शुल्कापोटी मोजाव्या लागणाऱ्या पैशात बचत करता येईल. किंमत कमी होण्यासोबतच विमा योजनांची विक्री आॅनलाइन केल्याचा मोठा फायदा हा विम्याच्या खरेदीसाठी होणार आहे.
ई-कॉमर्सवर एकाच उत्पादनासाठी वेगळ््या किमती
विमा कंपन्यांच्या स्वत:च्या वेबसाइटवर आणि एजंटच्या वेबसाइट सोबत विम्याच्या उत्पादनांची खरेदी ही ई-कॉमर्स वेबसाइटवरूनही उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ‘इरडा’च्या विचाराधीन आहे.
मात्र, असे करताना विमा कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या विक्री प्रक्रियेत बदल करावा लागणार आहे. आजच्या घडीला लोक ई-कॉमर्स कंपन्यांवरून जेव्हा विविध उत्पादनांची खरेदी करतात, तेव्हा त्यांच्या आकर्षणाचा मुख्य मुद्दा असतो, तो एखाद्या उत्पादनावर मिळणारी घसघशीत सूट.
हेच सूत्र जोपासून
विमा कंपन्यांनाही वेगवेगळ््या ई-कॉमर्स वेबसाइटवर एकाच उत्पादनाच्या विक्रीसाठी वेगवेगळ््या
दरांची आकारणी करावी लागेल.

Web Title: Insurance is cheap because of online shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.