Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफधारकाचे विमा संरक्षण ५.५ लाख करणार

पीएफधारकाचे विमा संरक्षण ५.५ लाख करणार

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) कर्मचारी डिपॉझिट लिंकड् इन्शूरन्स (ईडीएलआय) योजनेंतर्गत विम्याचे संरक्षण जास्तीत जास्त ५.५ लाख रुपये करू शकते. सध्या हे संरक्षण ३.६ लाख रुपये आहे

By admin | Published: September 6, 2015 09:39 PM2015-09-06T21:39:33+5:302015-09-06T21:39:33+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) कर्मचारी डिपॉझिट लिंकड् इन्शूरन्स (ईडीएलआय) योजनेंतर्गत विम्याचे संरक्षण जास्तीत जास्त ५.५ लाख रुपये करू शकते. सध्या हे संरक्षण ३.६ लाख रुपये आहे

The insurance cover of PF holders is 5.5 lakh | पीएफधारकाचे विमा संरक्षण ५.५ लाख करणार

पीएफधारकाचे विमा संरक्षण ५.५ लाख करणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) कर्मचारी डिपॉझिट लिंकड् इन्शूरन्स (ईडीएलआय) योजनेंतर्गत विम्याचे संरक्षण जास्तीत जास्त ५.५ लाख रुपये करू शकते. सध्या हे संरक्षण ३.६ लाख रुपये आहे.
ईपीएफओच्या सहा लाखांपेक्षा जास्त अंशधारकांना विम्याचा लाभ वाढविण्यासाठीचा प्रस्ताव पेन्शन आणि ईडीएलआय समन्वय समितीच्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाईल. बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत हा प्रस्ताव समाविष्ट आहे.
मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्रीय विश्वस्त मंडळासमोर मांडला जाईल. या संस्थेचे अध्यक्ष कामगारमंत्री असतात. सुधारित ईडीएलआय योजना कामगार मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार लागू केले जाईल.
सध्या ईडीएलआयअंतर्गत कोणत्याही ईपीएफओ अंशधारकाला एकाच संस्थेत सलग एक वर्ष नोकरी केल्यानंतर मृत्यू आल्यास त्याच्या वारसाला मृत कर्मचाऱ्याच्या गेल्या १२ महिन्यांच्या त्याच्या सरासरी मासिक वेतनाच्या २० पट रक्कम २० टक्के बोनससह दिली जाईल.
या हिशेबाने या योजनेसाठी सध्या जास्तीत जास्त १५ हजार रुपये दरमहा वेतन विचारात घेतल्यास ३.६ लाख रुपये विम्याची रक्कम
होते.
याशिवाय १२ महिन्यांपेक्षा कमी आणि किमान १२ महिने पूर्ण करणाऱ्या अंशधारकांबाबत विम्याची रक्कम निश्चित करताना सध्या वापरली जाणारी वेगवेगळी पद्धतदेखील रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. सध्याची योजना ही अंशधारकाची सेवा १२ महिन्यांपेक्षा कमी असल्यास त्याला जास्तीत जास्त १.२ लाख रुपये विम्याचे मिळू शकतात. ज्या अंशधारकाच्या खात्यात ५० हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम आहे त्यांना १.२ लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण मिळू शकते. ज्यांच्या भविष्य निधी खात्यात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे त्यांना तेवढ्याच रकमेच्या विम्यावर हक्क सांगता येईल. त्यशिवाय ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या रकमेच्या ४० टक्के भागही त्यांना मिळेल. मात्र, यासाठी जास्तीत जास्त १ लाख रुपयांची मर्यादा आहे. हा अंशधारक त्याला दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २० पट बोनसलाही पात्र आहे.

Web Title: The insurance cover of PF holders is 5.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.