लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात ओमायक्राॅनचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने आणखी कठाेर निर्बंध लावल्यास लग्न साेहळ्यांच्या आयाेजनावर माेठा परिणाम हाेण्याची शक्यता आहे. कदाचित, विवाह साेहळे रद्द करावे लागू शकतात किंवा ते पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते. तसे केल्यास वधू पक्ष असाे किंवा वर पक्ष, दाेघांनाही माेठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असतेच. अशा वेळी वेडिंग इन्शुरन्स फायद्याचा ठरू शकताे.
आजकाल लग्न साेहळा म्हणजे एक माेठा इव्हेंट असताे. त्यासाठी दाेन्ही पक्षांकडून लाखो रुपये खर्च केला जाताे. मात्र, काेणत्याही कारणाने हा साेहळा रद्द करावा लागला किंवा पुढे ढकलण्याची वेळ आली, तर आर्थिक नुकसान हाेतेच, शिवाय आनंदावर विरजणही पडते.
लग्न समारंभाचा विमा आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. लग्नाचा विमा चार वेगवेगळ्या परिस्थितीसाठी काढता येताे. लग्न साेहळा रद्द हाेणे, मालमत्तेचे नुकसान, वैयक्तिक अपघात, तसेच इतर थर्ड पार्टी जबाबदाऱ्यांवर विम्याचे
संरक्षण मिळते.
या बाबी हाेतात कव्हर
nकॅटेरिंग, लग्न समारंभाचे स्थळ, ट्रॅव्हल एजंसी, हाॅटेल बुकिंग, संगीत समाराेह, सजावट, निमंत्रण पत्रिका इत्यादींसाठी दिलेली आगाऊ रक्कम या विम्याद्वारे कव्हर केला जाताे.
प्रीमियम अतिशय कमी
nविम्यासाठी खर्च किती, हा प्रश्न पडला असेल, तर या प्रीमियमची रक्कम अतिशय कमी असते.
nएकूण विमा रकमेच्या ०.७ ते २ टक्के प्रीमियम आकारण्यात येताे. म्हणजे, १० लाख रुपयांचा विमा घेत असल्यास केवळ ७ हजार ५०० ते १५ हजार रुपये प्रीमियम माेजावा लागेल.