Join us  

Health Insurance : आरोग्य विमा घ्यायचाय? पण, सरकारी व खासगी कंपनीबाबत आहे कन्फ्यूजन; वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 1:27 PM

Health Insurance : काही पॅरामीटर्सवर सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या आरोग्य विमा योजनांची तुलना करण्यात आली आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्यासाठी कोणती योजना चांगली आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या काळात वैद्यकीय खर्च पाहता एखादा विमा काढणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आरोग्य विमा क्षेत्रात सरकारी आणि खाजगी दोन्ही कंपन्या आहेत. अशा स्थितीत आरोग्य विमा सरकारी कंपनीकडून घ्यावा की खासगी कंपनीकडून घ्यावा, असा संभ्रम लोकांच्या मनात कायम असतो. दरम्यान, काही पॅरामीटर्सवर सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या आरोग्य विमा योजनांची तुलना करण्यात आली आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्यासाठी कोणती योजना चांगली आहे.

प्रीमियम आणि सवलतसरकारी आरोग्य विमा कंपन्यांच्या योजनांचा प्रीमियम हा खाजगी आरोग्य विमा कंपन्यांपेक्षा कमी असतो. यासोबतच सरकारी कंपन्यांच्या आरोग्य विमा योजनांवर काही प्रसंगी सवलतही मिळते. तर, खाजगी आरोग्य विमा कंपन्या त्यांच्या योजनांचा प्रीमियम बाजारानुसार ठरवतात. यावरील सवलत सरकारच्या तुलनेत कमी असते.

NCB बेनिफिटतुम्हाला NCB म्हणजेच नो क्लेम बोनसचा लाभ सरकारी कंपन्यांच्या योजनांसोबत मिळत नाही. तर सर्व खाजगी कंपन्या आपल्या योजनांसह NCB चा लाभ देतात.

कव्हरेजसरकारी आरोग्य विमा कंपन्यांच्या योजनांमध्ये तुम्हाला खूप मर्यादाही दिल्या जातात. दुसरीकडे, सर्व वैद्यकीय खर्च खाजगी आरोग्य विमा कंपन्यांमध्ये समाविष्ट केले जातात, जरी ते मुख्यत्वे तुम्ही निवडलेल्या योजनेवर अवलंबून असतात.

विमा रक्कम आणि कर लाभयामध्ये तुम्हाला मर्यादित विमा रक्कम मिळते, तर खाजगी आरोग्य विमा कंपन्यांमध्ये तुम्ही भरलेल्या प्रीमियमनुसार तुम्हाला विमा रक्कम मिळते. प्राप्तिकराच्या कलम 80D अंतर्गत, जर तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दिलेल्या प्रीमियमवर 25,000 रुपये आणि सोबत तुमच्या पालकांच्या आरोग्य विम्यासाठी प्रीमियम देखील भरला, तर तुम्ही आयटीआरमध्ये (ITR) 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकता.

टॅग्स :आरोग्यव्यवसाय