Join us

गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 1:40 PM

LPG Gas Connection : गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल सांगितले पाहिजे. परंतु बहुतांश घटनांमध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन देताना डीलर्स याबाबत माहिती देत ​​नसल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली : जर तुम्ही अद्याप गॅस कनेक्शन (Gas Connection) घेतले नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज भारतातील जवळपास प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचे (Gas Cylinder) कनेक्शन आहे. पण अनेकांना गॅस सिलिंडरशी संबंधित ग्राहकांच्या अधिकारांबाबत माहिती नसते.  गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल सांगितले पाहिजे. परंतु बहुतांश घटनांमध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन देताना डीलर्स याबाबत माहिती देत ​​नसल्याचे दिसून येते. म्हणूनच ग्राहकांनी स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असले पाहिजे.

दरम्यान, जे एलपीजी गॅस कनेक्शन घेतात त्यांचा 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा असतो. या पॉलिसीला एलपीजी इन्शुरन्स कव्हर म्हणतात. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी विमा दिला जातो. तुम्हाला गॅस कनेक्शन मिळताच तुम्ही या पॉलिसीसाठी पात्र ठरता. नवीन कनेक्शन मिळताच तुम्हाला हा विमा मिळेल.

तुमचा एलपीजी विमा तुम्ही गॅस सिलिंडर खरेदी करताना केला जातो. तुम्हाला सतत एक्स्पायरी डेट पाहूनच सिलिंडर घ्यावा लागेल. कारण ते विमा सिलिंडरच्या एक्सपायरी डेटशी जोडलेले असते. गॅस कनेक्शन मिळताच तुम्हाला 40 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. यासोबतच सिलिंडरच्या स्फोटामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त मासिक प्रीमियम भरावा लागणार नाही. गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास पीडितेच्या कुटुंबीयांना त्यासाठी दावा करता येईल.

ग्राहकाने अपघात झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि जवळच्या पोलीस स्टेशनला अपघाताची तक्रार करावी. अपघाताच्या एफआयआरची प्रत पोलिसांकडून घेणे आवश्यक आहे. दाव्यासाठी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या प्रतसोबतच वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे.

कंपन्या उचलतात अपघाताचा संपूर्ण खर्च दरम्यान, ज्या व्यक्तीच्या नावावर सिलिंडर आहे, त्यालाच विम्याची रक्कम मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्ही कोणालाही नॉमिनी बनवू शकत नाही. क्लेमचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल, ज्यांचे सिलिंडरचे पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर ISI मार्कचे आहेत. क्लेमसाठी, तुम्ही सिलिंडर आणि स्टोव्हचे नियमित तपासणी केली पाहिजे. तुमचा वितरक तेल कंपनी आणि विमा कंपनीला अपघाताची माहिती देतो. इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल यासारख्या तेल कंपन्या सिलिंडरमुळे अपघात झाल्यास विम्याचा संपूर्ण खर्च उचलतात. 

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय