नवी दिल्ली - कोविड-१९ साथीच्या काळात लोकांना विम्याचे महत्त्व कळाल्यामुळे विम्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील ३ वर्षांत विम्याच्या हप्त्यात (प्रीमियम) २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे.
कोविड काळानंतर विम्याचे दरही वाढले आहेत. त्याबाबत लोकांत नाराजी आहे. एचडीएफसी एर्गो, स्टार हेल्थ, निवा बूपा आणि न्यू इंडिया ॲश्यूरन्स यांसह सर्वच आघाडीच्या विमा कंपन्यांनी आपल्या विमा हप्त्यांत वाढ करण्याची घोषणा केली आहे. सध्या डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रो या आजारांवरील उपचाराचा खर्च १.५ लाख रुपयांवर पोहोचला आहे.
का वाढला विमा हप्ता?
- वैद्यकीय महागाईचा दर आशियात सर्वाधिक १४ टक्के आहे. खर्चातील वाढीमुळे विमा हप्ता वाढला आहे.
- ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि जुनाट आजार वाढत आहे. त्यामुळे विमा हप्त्यात वाढ होत आहे.
- दाव्यांचा खर्च पूर्ततेसाठी अधिक पैशाची गरज लागत असल्यानेकंपन्या विम्यांचा हप्ता वाढवित आहेत.
- ३ वर्षांत मोसमी आजारांच्या दाव्यांत १५० टक्के वाढ झाली आहे.