दावे निकालात काढण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाचा तिसरा क्रमांक लागतो, असे अलीकडेच करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात आयुर्विमा कंपन्यांनी ९० टक्के दावे निकाली काढले आहेत.
काय सांगतो अहवाल?
- ११ लाख दावे विमा कंपन्यांकडे आले. १० लाख ८४ हजार दावे निकाली काढण्यात आले.
- ९५२७ दावे फेटाळून लावण्यात आले.
- २६,४२२ कोटी रुपये एवढ्या रकमेचे दावे निकाली काढले आहेत.
- भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ३१ मार्च २०२१ पर्यंत ९८% दावे निकाली काढले.
क्लेम सेटलमेंट का महत्त्वाचे?
- विमा कवच घेतेवेळी आयुर्विमा कंपनीने किती दावे निकालात काढले आहेत, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
- संबंधित विमा कंपनीने किती कमी वेळात दावे निकाली काढले आहेत, यावर त्या कंपनीची पत ठरत असते.
कसे ठरते रेटिंग?
- विम्याचे दावे निकाली काढण्याचे प्रमाण ९० टक्के असेल तर कंपनीचे रेटिंग वाढते.
- जनमानसांत त्या कंपनीविषयी सकारात्मक मते निर्माण होतात.
- कंपनीही सर्व दावे नीट पाहून-निरखून मगच निकाली काढत असते. या सगळ्यात एलआयसी पुढे आहे.
मृत्यूचे विमा दावे निकाली काढण्याचे प्रमाणमॅक्स लाइफ : ९९.३५%एगॉन : ९९.२५%भारती अक्सा : ९९.०५%एलआयसी : ९८.६२%