नवी दिल्ली - दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांसाठी आंतरजोडण्यासंबंधी (इंटरकनेक्टिव्हिटी) नियम निश्चित केले आहेत. एखाद्या दूरसंचार आॅपरेटरने विनंती केल्यानंतर, ३0 दिवसांच्या आत त्याच्यासोबत ‘नि:पक्षपातीपणाच्या आधारावर’ आंतरजोडणी करार करणे आॅपरेटरांना बंधनकारक करण्यात आले आहे.
ट्रायने ‘दूरसंचार आंतरजोडणी नियम २0१८’ नावाने या संबंधीची नियमावली जाहीर केली आहे. यात नेटवर्क जोडणी करार, प्राथमिक पातळीवर कंपन्यांत अशा जोडणींची अधिकृत तरतूद, आंतरजोडण्याचे बिंदू वाढविणे, त्यासाठी लागू असणारे शुल्क, पोर्ट्स जोडणी खंडित करणे आणि आंतरजोडण्यांच्या मुद्द्यावरील वित्तीय स्थिती याविषयी नियम गठीत केलेले आहेत. हे नियम १ फेब्रुवारी २0१८ पासून लागू होणार आहेत. हे नियम भारतात दूरसंचार सेवा देणाºया सर्व आॅपरेटरांना लागू राहणार
आहेत.
ट्रायने म्हटले की, समोरच्या आॅपरेटरकडून विनंती प्राप्त झाल्यानंतर, ३0 दिवसांच्या आत आंतरजोडणी करार करणे विनंती मिळालेल्या आॅपरेटरसाठी बंधनकारक आहे. त्यात आॅपरेटरला कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करता येणार नाही. या व्यवस्थेची चौकट आणि आंतरजोडणी पोर्ट्सची संख्या वाढविण्यासाठीची संरचना यात निश्चित करण्यात आली आहे. हे नियम निश्चित करण्यासाठी ट्रायने आॅक्टोबर २0१६ मध्ये सल्लामसलतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यात थेट चर्चा झाल्या, तसेच संबंधितांकडून लेखी सूचनाही मागविण्यात आल्या.
२0१६ मध्ये रिलायन्स जिओच्या आगमनानंतर आंतरजोडण्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या मुद्द्यावर जिओचा भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या प्रस्थापित कंपन्यांसोबत वाद झाला होता. प्रस्थापित कंपन्या जोडण्या उपलब्ध करून देत नसल्यामुळे, आपल्या नेटवर्कवरून करण्यात येणारे कॉल अयशस्वी होत असल्याचा आरोप जिओकडून करण्यात आला होता. तो प्रस्थापित कंपन्यांनी फेटाळून लावला होता. या कंपन्यांनी कॉल अपयशी होण्यास जिओच्या नेटवर्कवरील मोफत व्हॉइस कॉलला दोष दिला होता.
मोफत कॉलमुळे होती समस्या
मोफत कॉलची सोय असल्यामुळे जिओच्या नेटवर्कवरून ट्रॅफिकची त्सुनामी आलेली आहे. त्यामुळे जोडण्या उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे, असा बचाव कंपन्यांनी केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रायचे नवे नियम महत्त्वाचे आहेत. आता कंपन्यांना नियमानुसार आंतरजोडणी करार करणे, तसेच पुरेसे जोडणी बिंदू उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.
आंतरजोडणीचे नियम निश्चित, दूरसंचार कंपन्यांनी करार करावेत - ट्राय
दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांसाठी आंतरजोडण्यासंबंधी (इंटरकनेक्टिव्हिटी) नियम निश्चित केले आहेत. एखाद्या दूरसंचार आॅपरेटरने विनंती केल्यानंतर, ३0 दिवसांच्या आत त्याच्यासोबत ‘नि:पक्षपातीपणाच्या आधारावर’ आंतरजोडणी करार करणे आॅपरेटरांना बंधनकारक करण्यात आले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:06 AM2018-01-03T01:06:44+5:302018-01-03T01:07:20+5:30