नवी दिल्ली : अनेक ज्येष्ठ नागरिक प्रॉव्हिडंड फंड वा अन्य रक्कम बँकांमध्ये मुदत ठेवींच्या (फिक्स्ड डिपॉझिट) रूपात ठेवत असतात. आजारपणात पटकन रक्कम काढता यावी, यासाठी त्यांच्या ठेवी बऱ्याचदा एक ते दोन वर्षांच्या असतात. पण स्टेट बँकेने मुदत ठेवींवरील व्याज कमी केल्याने ज्येष्ठ नागरिकांचे मासिक उत्पन्न कमी होणार आहे.ज्येष्ठ नागरिकांचा घराजवळच्या बँकेतच ही रक्कम ठेवण्यावर भर असतो. स्टेट बँकेने एक ते दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज आता कमी होणार आहे. याशिवाय बचत खात्यांतील रकमेवरील व्याजही ३.५0 टक्क्यांवरून ३.२५ टक्के केले आहे.स्टेट बँकेने कमी मुदतीच्या तसेच कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदर 0.१0 टक्क्यांनी कमी केला आहे. तसेच मोठ्या रकमेवरील तसेच जास्त मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात 0.३0 टक्के इतकी कपात केली आहे. स्टेट बँकेनेच दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ४ कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची खाती आहेत. त्या खात्यांमध्ये असलेली रक्कम आहे तब्बल १४ लाख कोटी रुपये. बँकेकडून मुदत ठेवींवर मिळणाºया व्याजावर अवलंबून असणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसेल.रेपो रेटचा परिणामरिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सांगितले आहे की, त्यांनी आपले व्याजाचे दर एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट आॅफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) ला नव्हे, तर रेपो रेटला जोडावेत, कारण रेपो रेट सतत बदलत असतो. याच महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली. अन्य बँकांनी असा निर्णय घेतला नसला तरी त्याही लवकरच बचत व मुदत ठेवींवरील व्याज दरात कपात करण्याची शक्यता आहे.
मुदत ठेवींवरील व्याज स्टेट बँकेने केले कमी; ज्येष्ठांना मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 4:35 AM