नवी दिल्ली : एचडीएफसी बँकेने दिवाळीच्या मुहूर्तावर विविध मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात 0.५ टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. बँक आॅफ बडोदाने मात्र कर्जावरील व्याजदर 0.१ टक्क्याने वाढविला आहे.एचडीएफसी बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवरील नवे व्याजदर मंगळवारपासून अमलात येत आहेत. ५ ते ८ वर्षे आणि ८ ते १0 वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ६ टक्क्यांवरून ६.५ टक्के करण्यात आला आहे. ३ ते ५ वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ७.१ टक्क्यांवरून ७.२५ टक्के करण्यात आला आहे. एक वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ७.२५ टक्क्यांवरून ७.३0 टक्के करण्यात आला आहे.
एचडीएफसी बँकेच्या ठेवींवरील व्याजदरात 0.५ टक्क्यापर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 4:24 AM