मुंबई : वाढत असलेल्या महागाईवर उपाय म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्याचे व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून चालू वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कठीण असल्याचे मत बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे.
रिझर्व्ह बँकेने द्विमासिक पतधोरणाची घोषणा केली. याबरोबरच सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, लघुउद्योजक यांना दिलासा देणाऱ्या काही घोषणाही दास यांनी केल्या. सोन्यावर घेतल्या जाणाºया कर्जाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय दास यांनी घोषित केला. अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करून दास यांनी आगामी काळात त्यामध्ये कसा बदल होऊ शकतो ते स्पष्ट केले. महागाई वाढत आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकेने व्याजदर कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होणार असून, दुसºया सहामाहीत वाढ होण्याची शक्यता असली तरी संपूर्ण वर्षाचा विचार करता अर्थव्यवस्थेचा संकोच होण्याची भीती त्यांनी वर्तविली.
सर्वसामान्यांना ‘सोनेरी’ दिलासा
सध्या सोन्याच्या निर्धारित दराच्या ७५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते. ही रक्कम ९० टक्क्यांवर नेण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरांनी केली आहे. म्हणजेच सर्वसामान्यांना आता सोन्याच्या तारणावर ९० टक्के कर्ज मिळेल.
उद्योजकांना मदतीचा हात
कंपन्या तसेच उद्योजकांना वैयक्तिक पातळीवर घेतलेल्या कर्जांची फेररचना करण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. त्याचबरोबर गृहबांधणी क्षेत्राला मदत मिळावी यासाठी १० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम नाबार्डला देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
सोने ५६ हजार ४००, चांदी ७३ हजार ५०० रुपये
जळगाव : गुरुवारी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ होऊन ते ५६ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले. चांदीतही अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन ती ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. दोन दिवसात चांदी सहा हजाराने वधारली आहे.
ग्रॅच्युइटी : पाच वर्षे सेवेचा निकष एक वर्ष करावा
ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी सलग पाच वर्षे
सेवेत असण्याचा निकष कमी करून एक वर्ष करण्यात यावा, अशी शिफारस संसदेच्या
एका स्थायी समितीने केली आहे.
पाच वर्षांच्या निकषामुळे अनेक
रोजगारदाते कर्मचाऱ्यांना पाच वर्षे होण्याच्या आधीच सेवेतून काढून टाकतात, असे
निरीक्षण समितीने नोंदविले आहे.