नवी दिल्ली : एस्सार आॅइल आणि मंगळुरू रिफायनरी (एमआरपीएल) यासारख्या कंपन्यांनी खरेदी केलेल्या कच्च्या तेलाच्या ६.५ अब्ज डॉलरच्या थकबाकीवर इराणला १.५ टक्के दराने व्याज देण्यास भारताने सहमती दर्शविली आहे.थकबाकीवर इराणने लिबॉरशिवाय 0.७५ टक्के दराने अतिरिक्त व्याजाची मागणी केली होती. विदेशी चलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी इराणने ही मागणी केली होती.वित्त खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘इराणने व्याजाची मागणी केली असली, तरीही व्याजाची कोणतीही थकबाकी आमच्यावर नाही, असे आमचे मत आहे. तथापि, इराणबाबत एक सद्भावना म्हणून तेलकंपन्या हे व्याज देण्यास तयार झाल्या आहेत.’ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एप्रिलमध्ये इराणच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर वलिवुल्लाह सैफ यांच्याशी चर्चा केली होती. त्यात सैफ यांनी व्याजाची मागणी केली होती.
तेल थकबाकीवर भारत देणार व्याज
By admin | Published: May 04, 2016 2:23 AM