नवी दिल्ली- मोदी सरकारनं मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलेल्या सवलतीमुळे कर रचनेतही मोठा बदल झाला आहे. त्यामुळे करदात्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट 5 लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशभरातील 3 कोटी करदात्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. 80 सी अन्वये वजावटीची मर्यादा 1.5 लाख रुपयेच कायम ठेवण्यात आली आहे.
आयकर कायद्याच्या 80 सी कलमाखाली असलेल्या विविध योजनांमधील दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. सरकारनं केलेल्या करामधल्या बदलामुळे कररचनाही बदलली आहे. 5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. या कर रचनेतील बदलामुळे 3 कोटी वेतनधारक आणि पेन्सनर्सना 4700 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
वार्षिक सहा लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीचा 20 हजार 800 रुपये कर द्यावा लागणार असून, त्या व्यक्तीला 13 हजारांचा फायदा होणार आहे. तर 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला 41 हजार 600 रुपये कर द्यावा लागणार असून, त्या व्यक्तीचे 13 हजार रुपये वाचणार आहेत. तर 10 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला 1 लाख 4 हजारांचा कर द्यावा लागणार आहे. त्या व्यक्तीलाही 13 हजारांचा फायदा होणार आहे. 12 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीचेही कराच्या स्वरूपात 1 लाख 60 हजार कापले जाणार असून, त्या व्यक्तीला 13 हजार रुपये लाभ मिळणार आहे.
Budget 2019 : सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली, आता 20 लाख रुपये मिळणार https://t.co/uS41BrsMnd
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019
15 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीलाही 2 लाख 60 हजार रुपये कर द्यावा लागणार आहे. तसेच त्यालाही 13 हजारांचा फायदा पोहोचणार आहे. 30 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला 7 लाख 28 हजार कराच्या स्वरूपात भरावे लागणार असून, 13 हजारांचा फायदा होणार आहे. 50 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला 14 लाख 87 हजार कर चुकवावा लागणार आहे. तसेच त्या व्यक्तीला 14 हजार 300 रुपयांचा फायदा पोहोचणार आहे.
कमाई | कर | फायदा |
5 लाख रुपये | 0 | 13 हजार रुपये |
6 लाख रुपये | 20 हजार 800 रुपये | 13 हजार रुपये |
7 लाख रुपये | 41 हजार 600 रुपये | 13 हजार रुपये |
10 लाख रुपये | 1 लाख 4 हजार रुपये | 13 हजार रुपये |
12 लाख रुपये | 1 लाख 60 हजार रुपये | 13 हजार रुपये |
15 लाख रुपये | 2 लाख 60 हजार रुपये | 13 हजार रुपये |
30 लाख रुपये | 7 लाख 28 हजार रुपये | 13 हजार रुपये |
50 लाख रुपये | 14 लाख 87 हजार रुपये | 14 हजार 300 रुपये |
Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार https://t.co/vBCoDhq1Mw#Budget2019#BudgetSession2019
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019
#Budget2019 संबंधित सर्व ताजे अपडेट्स मिळतील https://t.co/nxY0WFdt8L या एका क्लिकवर. pic.twitter.com/crQMYkWBmY
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 1, 2019