Join us

Budget 2019 : असंघटित कामगारांना दरमहा 3 हजार पेन्शन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 12:15 PM

मोदी सरकारनं कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. 100 रुपये प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 60 वर्षांच्या वयानंतर प्रतिमहिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

ठळक मुद्देमोदी सरकारनं कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. 100 रुपये प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 60 वर्षांच्या वयानंतर प्रतिमहिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.18व्या वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास दरमहा 55 रुपयेच गुंतवावे लागणार आहेत.

नवी दिल्ली- मोदी सरकारनं कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. 100 रुपये प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 60 वर्षांच्या वयानंतर प्रतिमहिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. 18व्या वर्षांपासून गुंतवणुकीला सुरुवात केल्यास दरमहा 55 रुपयेच गुंतवावे लागणार आहेत. मोदी सरकारच्या या योजनेचा वयोवृद्ध पेन्शनधारकांना मोठा फायदा मिळणार आहे. असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे, तर 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार असल्याचंही गोयल म्हणाले आहेत. 

लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना गोयल यांनी कामगारांसाठीची ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. आता जास्तीत जास्त २० लाख रुपयांची ग्रॅच्युईटी दिली जाणार आहे.

Budget 2019 Latest News & Live Updates

ही ग्रॅच्युईटी ही करमुक्तच राहणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.सध्या ग्रॅच्युईटीसाठीची अधिकतम मर्यादा १० लाख रुपयांची आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भविष्य निर्वाह निधी योजनेमधील खात्यांची २ कोटींनी वाढ झाल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ देशाामध्ये नोकऱ्या निर्माण होत असल्याने विरोधकांचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नवीन पेन्शन योजना ही अधिक आकर्षक बनविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. या योजनेच्या अंशदानातील सरकारचा वाटा चार टक्क्यांनी वाढवून तो आता १४ टक्के केला जात असल्याची घोषणाही गोयल यांनी आपल्या भाषणामध्ये केली. यामुळे आता ही नवीन पेन्शन योजना अधिक आकर्षक होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
  • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
  • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
  • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
  • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
  • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
  • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
  • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
  • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
  • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं
टॅग्स :अर्थसंकल्प 2019पीयुष गोयलकर्मचारीसरकारी योजनाभाजपाइन्कम टॅक्स