Join us  

अदानींविरोधात आंतरराष्ट्रीय कट! हिंडेनबर्गनं दोन महिन्यांपूर्वीच क्लायंटशी शेअर केलेला रिपोर्ट, मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 9:29 AM

Adani Hindenburg Report SEBI : हिंडेनबर्गनं सार्वजनिक करण्याच्या दोन महिने आधी अदानींशी निगडीत अहवाल आपल्या ग्राहकांसोबत शेअर केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Adani Hindenburg Report SEBI : हिंडेनबर्गनं सार्वजनिक करण्याच्या दोन महिने आधी अदानींशी निगडीत अहवाल आपल्या ग्राहकांसोबत शेअर केला असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानी समूहाविरोधात आपल्या रिपोर्टची कॉपी प्रकाशित होण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच आपल्या क्लायंटसोबत शेअर केली होती. न्यूयॉर्कस्थित हेज फंड मॅनेजर मार्क किंगडन यांना ही माहिती देण्यात आली होती. त्यांनी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समधील चढउतारांचा फायदा घेतला. बाजार नियामक सेबीनं (SEBI) हा दावा केला आहे. सेबीनं हिंडेनबर्गला पाठवलेल्या ४६ पानांच्या 'कारणे दाखवा नोटीस'मध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

अदानी समूहातील १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्यांकन घसरल्यानं अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्गला कसा फायदा झाला, हे सेबीनं सांगितलं आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर समूहातील कंपन्यांमध्ये १५० अब्ज डॉलरची मोठी घसरण झाली होती. हिंडेनबर्गनं या रिपोर्टची प्रत न्यूयॉर्कमधील हेज फंड आणि कोटक महिंद्रा बँकेशी संबंधित ब्रोकरला यापूर्वीच दिली असल्याचं त्यांनी नमूद केलंय.

सेबीच्या नोटिसवर हिंडेनबर्गचं उत्तर

सेबीच्या या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना हिंडेनबर्गनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. "भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींनी केलेला भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा पर्दाफाश करणाऱ्यांना गप्प करण्याचा आणि घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे," असं हिंडेनबर्गनं म्हटलं. यासोबतच त्यांनी खुलासा केला की अदानी समूहाची प्रमुख फ्लॅगशिप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसविरोधात बेट लावण्यासाठी ज्यांचा वापर केला त्यात कोटक महिंद्रा बँकेची मॉरिशसस्थित उपकंपनी कोटक महिंद्रा (इंटरनॅशनल) लिमिटेडशी (केएमआयएल) संबंधित होती. केएमआयएलच्या फंडानं आपल्या क्लायंट किंग्डन कॅपिटल मॅनेजमेंटसाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडवर बेट लावली होती.

सेबीच्या नोटिसमध्ये अदानी एंटरप्रायझेसमधील (एईएल) फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट विकण्यासाठी हेज फंडातील कर्मचारी आणि केएमआयएलचे ट्रेड्स यांच्यात झालेल्या 'चॅट'चं अंश समाविष्ट आहेत. किंग्डननं हिंडेनबर्गशी आपला कोणताही संबंध असल्याचं कधीही उघड केलं नाही. तसंच ते कोणत्याही किमतीच्या संवेदनशील माहितीच्या आधारे काम करत नव्हते, असं कोटक महिंद्रा बँकेनं म्हटलं.

टॅग्स :गौतम अदानीसेबी