Lokmat Money > बिझनेस न्यूज > Women's Day 2021: फक्त महिला अधिकाऱ्यांची होणार भरती; 'या' मोठ्या सरकारी कंपनीची घोषणा

Women's Day 2021: फक्त महिला अधिकाऱ्यांची होणार भरती; 'या' मोठ्या सरकारी कंपनीची घोषणा

Women's Day 2021: भरतीच्यावेळी महिला कर्मचाऱ्यांसाठी अर्ज फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:57 AM2021-03-08T09:57:40+5:302021-03-08T09:59:21+5:30

Women's Day 2021: भरतीच्यावेळी महिला कर्मचाऱ्यांसाठी अर्ज फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे.

international womens day 2021 ntpc announces recruitment drive for women details here | Women's Day 2021: फक्त महिला अधिकाऱ्यांची होणार भरती; 'या' मोठ्या सरकारी कंपनीची घोषणा

Women's Day 2021: फक्त महिला अधिकाऱ्यांची होणार भरती; 'या' मोठ्या सरकारी कंपनीची घोषणा

Highlightsमहिला दिनाच्या (International women's Day) एक दिवस आधी महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष भरती मोहीम जाहीर केली.

नवी दिल्ली : राज्य सरकारद्वारे संचालित विद्युत कंपनी एनटीपीसीने (National Thermal Power Corporation) महिला दिनाच्या (International women's Day) एक दिवस आधी महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष भरती मोहीम जाहीर केली. महिला दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठी एकात्मिक विद्युत कंपनी एनटीपीसी लिमिटेडने (NTPC Ltd.) आपल्या कार्यक्षेत्रात विशेष महिला भरती मोहिमेच्या रूपात केवळ महिला अधिकारी भरती करण्याची योजना जाहीर केली, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. (international womens day 2021 ntpc announces recruitment drive for women details here)

कंपनीने काय म्हटले आहे?
कंपनीच्या निवेदनानुसार, एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे आणि आता ही कंपनी महिला शक्ती आणखी मजबूत करेल. अशा भरती मोहिमेमुळे एनटीपीसीसाठी जेंडर डायवरसिटीमध्ये वाढ होईल. एनटीपीसी जेथे शक्य असेल तेथे जेंडर गॅपमध्ये सुधारण्याचे काम करत आहे.

अर्ज फी पूर्णपणे माफ
एनटीपीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाधिक महिला अर्जदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. भरतीच्यावेळी महिला कर्मचाऱ्यांसाठी अर्ज फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. महिला कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी एनटीपीसीकडून मुलांची देखभाल वेतन, प्रसूती रजा, विश्रांती रजा अशा विविध धोरणांचे पालन करण्यात येते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक केमिस्टच्या पदांसाठी NTPC Recruitment 2021) अर्ज मागितले आहेत. अर्ज करण्यासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइट ntpc.co.in किंवा ntpccareers.net वर जाऊन या पदांसाठी (NTPC Recruitment 2021) अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2021 पर्यंत आहे.
 

Web Title: international womens day 2021 ntpc announces recruitment drive for women details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.