Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंटरनेटविश्व १० हजार २०० कोटींकडे

इंटरनेटविश्व १० हजार २०० कोटींकडे

इंटरनेट आॅफ थिंग्स (आयओटी) आणि आर्टिफिशीअल इंटेलिजन्स (एआय) या दोन अत्याधुनिक क्षेत्रांचे उद्योगविश्व झपाट्याने १० हजार २०० कोटी रुपयांकडे जात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:50 AM2018-01-19T01:50:27+5:302018-01-19T01:50:30+5:30

इंटरनेट आॅफ थिंग्स (आयओटी) आणि आर्टिफिशीअल इंटेलिजन्स (एआय) या दोन अत्याधुनिक क्षेत्रांचे उद्योगविश्व झपाट्याने १० हजार २०० कोटी रुपयांकडे जात आहे.

Internet 10,000 crore 200 crore | इंटरनेटविश्व १० हजार २०० कोटींकडे

इंटरनेटविश्व १० हजार २०० कोटींकडे

नवी दिल्ली : इंटरनेट आॅफ थिंग्स (आयओटी) आणि आर्टिफिशीअल इंटेलिजन्स (एआय) या दोन अत्याधुनिक क्षेत्रांचे उद्योगविश्व झपाट्याने १० हजार २०० कोटी रुपयांकडे जात आहे. या माध्यमातूनच भारत पुढील आठ वर्षांत ५ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.
इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन आॅफ इंडियाची १२ वी इंडिया डिजिटल परिषद अलीकडेच झाली. त्यामध्ये येणारा काळ हा पूर्णपणे इंटरनेटवर आधारित असेल, यावर ऊहापोह करण्यात आला. यानिमित्ताने सुरेश प्रभू यांनी देशातील निर्मिती क्षेत्रावर प्रकाश टाकला.
५ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था, हे लक्ष्य गाठण्यात देशातील अत्याधुनिक निर्मिती क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असेल. देशातील निर्मिती क्षेत्राची या लक्ष्यात २० टक्के भागीदारी असेल. याच श्रेणीत देशांतर्गत तयार होणाºया वस्तूंना आंतरराष्टÑीय बाजारपेठ मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासंबंधीचे धोरण सध्या तयार केले जात आहे. त्याआधारे या क्षेत्रामार्फत २ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य आहे, असे प्रभू म्हणाले. निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत हेदेखील या वेळी उपस्थित होते. इंटरनेटमुळे तंत्रज्ञान मोठी झेप घेत असले तरी आजही ८५ टक्के उपकरणे त्यापासून दूर आहेत. यामुळे एकट्या आयओटी क्षेत्रात ७ हजार कोटी आणि एआय क्षेत्रात ३२०० कोटी रुपयांच्या व्यावसायिक उलाढालीला वाव आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Internet 10,000 crore 200 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.