Join us

देशाच्या अर्थव्यवस्थेतही ड्रॅगनची घुसखाेरी; तब्बल ३,५०० कंपन्यांचे संचालक चिनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:02 PM

काॅर्पोरेट खात्याचे मंत्री राव इंद्रजितसिंह यांनी लाेकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या सैनिकांचा अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा घुसखाेरी करण्याचा प्रयत्न भारताच्या शूर सैनिकांनी उधळून लावला. चीनची घुसखाेरी केवळ नियंत्रण रेषेपुरतीच मर्यादित नाही. देशात साडेतीन हजारांहून कंपन्यांचे संचालक चीनचे आहेत, तर चीनच्या १७४ कंपन्या भारतात नाेंदणीकृत आहेत.  सीमेवर तणाव वाढलेला असूनही चीनसाेबत द्विपक्षीय व्यापारात ४३ टक्के वाढ झाली आहे.

काॅर्पोरेट खात्याचे मंत्री राव इंद्रजितसिंह यांनी लाेकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की चीनचे गुंतवणूकदार आणि समभागधारक असलेल्या कंपन्यांचा नेमका आकडा सांगणे शक्य नाही. अशा प्रकारची आकडेवारी स्वतंत्रपणे काढली जात नाही, असे त्यांनी सांगितले. भारत अनेक गाेष्टींबाबत माेठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. याबाबत केंद्रीय उद्याेगमंत्री पीयूष गाेयल यांनी राज्यसभेत चिंता व्यक्त केली हाेती. 

या वस्तूंची चीनला हाेते निर्यातलाेह खनिज, पेट्राेलियम पदार्थ, कार्बनिक रसायन, रिफाइन्ड तांबे, कापूस, मासळी, काळे मिरे, काॅफी, चहा, मसाले, प्लॅस्टिक, कागद, साखर, वनस्पती तूप इत्यादी. या वस्तूंची चीनकडून हाेते आयातऑटाेमॅटिक डेटा प्राेसेसिंग मशीन, दूरसंचार उपकरणे, इलेक्ट्राॅनिक सर्किट, सेमिकंडक्टर उपकरणे, प्रतिजैविक औषधी, खते, टीव्ही, कॅमेरा, वाहनांचे सुटे भाग, लाईटिंग, इअरफाेन्स, हेडसेट इत्यादी.

चीनसाेबतचा वाढता व्यापारवर्ष     उलाढाल२००३-०४     ४.३४ अब्ज डाॅलर्स२०१३-१४     ५१.०३ अब्ज डाॅलर्स२०२०-२१     ६५.२१ अब्ज डाॅलर्स२०२१-२२     ९४.५७ अब्ज डाॅलर्स

टॅग्स :चीन