Lokmat Money > बिझनेस न्यूज > दररोज 100 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना करोडपती

दररोज 100 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना करोडपती

बऱ्याचदा गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, परंतु कुठल्या योजनेत गुंतवणूक करावी, याबाबत अनेकदा संभ्रम असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 09:25 AM2019-09-30T09:25:39+5:302019-09-30T09:29:31+5:30

बऱ्याचदा गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, परंतु कुठल्या योजनेत गुंतवणूक करावी, याबाबत अनेकदा संभ्रम असतो.

invest 100 rs per day in sip for and become crorepati know | दररोज 100 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना करोडपती

दररोज 100 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना करोडपती

नवी दिल्लीः बऱ्याचदा गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, परंतु कुठल्या योजनेत गुंतवणूक करावी, याबाबत अनेकदा संभ्रम असतो. पद्धतशीर गुंतवणूक योजना(Systematic Investment Plan) हासुद्धा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. दररोज 100 रुपयांची गुंतवणूक केल्यास पद्धतशीर गुंतवणूक योजने(एसआयपी)च्या माध्यमातून आपण करोडपती बनू शकता. जर समजा नवी नोकरीवर रूज झालेलो आहोत आणि गुंतवणूक करण्याची क्षमताही फार कमी असल्यास दररोज फक्त 100 रुपये गुंतवा, दररोज 100 रुपये गुंतवण्याचा पर्याय फारच स्वस्त सिद्ध होऊ शकतो.  SIPमध्ये मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. 

समभाग बाजार(Equity Market)शी संबंधित जाणकारांच्या मते, दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय उपलब्ध आहे. समभाग बाजारातल्या पद्धतशीर गुंतवणूक योजनेत 10 टक्क्यांपासून 16 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. त्यामुळे प्रतिदिन 100 रुपये गुंतवणूक केल्यास हीच योजना आपल्याला करोडपती बनवू शकते. 

  • 100 रुपये गुंतवणूक कसे बनाल करोडपती

समजा पद्धतशीर गुंतवणूक योजने(Systematic Investment Plan)च्या माध्यमातून आपण 100 रुपये दररोज गुंतवतो आहोत. ही गुंतवणूक कमीत कमी 12 टक्क्यांच्या परताव्यासाठी 30 वर्षांपर्यंत केल्यास 30 वर्षं पूर्ण झाल्यानंतर एकूण 10 लाख 95 हजार रुपये गुंतवणूक जमा होते. HDFC Mutual Fundच्या एसआयपी गुंतवणुकीचा हिशेब केल्यास 10.95 लाखांच्या गुंतवणुकीवर आपल्याला 97.29 लाख रुपये परतावा मिळतो. अशा प्रकारे दररोज 100 रुपये गुंतवणूक केल्यास 12 टक्क्यांच्या परताव्याचा हिशेब केल्यास जवळपास आपल्याला 1.08 कोटी रुपये मिळू शकतात.  

 

  • काय असतो पद्धतशीर गुंतवणूक योजनेचा फायदा
    पद्धतशीर गुंतवणूक योजने(Systematic Investment Plan)त गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्सद्वारे पर्याय उपलब्ध आहे. यात आपल्याला ठरावीक रक्कम गुंतवता येते. यात आपण प्रतिमहिना 500 रुपयांचीही गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूक करण्यासाठी मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. एसआयपीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कंपाऊंड इंटरेस्ट लावलं जातं. अशा प्रकारे आपण गुंतवलेली रक्कम वाढत जाते. 

Web Title: invest 100 rs per day in sip for and become crorepati know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.