नवी दिल्ली - निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी करिअरच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करायला हवी. पीपीएफ, एनपीएससह सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. ज्यांना निवृत्तीनंतर १००% रक्कम काढायची आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडाचे रिटायरमेंट फंड उपलब्ध आहेत.
हे फंड्स का चांगले?
यांचा सरासरी परतावा एनपीएस आणि इतर पर्यायांपेक्षा अधिक चांगला आहे. रिटायरमेंट फंड्स हे इक्विटी, डेट आणि रिट इनविटमध्ये गुंतवणूक करतात. हे पूर्णपणे इक्विटी डायव्हर्सिफाइड किंवा हायब्रीड फंड असू शकतात.
लॉक-इन किती?
फंडातील गुंतवणूक गुंतवणूकदार निवृत्त होईपर्यंत लॉक राहते. जर एक-दोन वर्षांमध्येच रिटायरमेंट असेल तर ५ वर्षांपर्यंत रक्कम यामध्ये राहील.
पैसे काढणे सोपे
लॉक-इन कालावधी संपल्यानंतर पैसे काढण्यावर यात कोणतेही बंधन नाही. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी गुंतवणूकदार पद्धतशीर पैसे काढण्याची योजना निवडू शकतात किंवा एकरकमी पैसे काढू शकतात. त्यांची इच्छा असल्यास, ते विमा कंपनीकडून वर्षाला किती पैसे काढायचे हे ठरवू शकतात.
कुणासाठी फायद्याचे?
हे फंड्स सर्व वयोगटांसाठी फायदेशीर आहे. चक्रवाढ व्याजाचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक लवकर सुरू करावी. हे फंड दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत. बाजारातील चढ-उतारासाठी तयार असलेले गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करू शकतात. जे लोक निवृत्तीच्या जवळ आहेत ते हायब्रीड रिटायरमेंट फंड निवडू शकतात.
- अधिक रिटर्न गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये रिटायरमेंट फंड्सच्या हायब्रिड योजनांमधून मिळाला आहे.
- परतावा इक्विटी योजनांचा राहिला आहे.