Join us

महिन्याला 84 रुपये भरा अन् मिळवा 24 हजार रुपये पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 1:36 PM

केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी अटल पेन्शन योजनाही विशेष आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी अटल पेन्शन योजनाही विशेष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015ला या योजनेची सुरुवात केली. ही योजना असंघटित क्षेत्रातील लोक आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा लोकांना केंद्रस्थानी ठेवून उपलब्ध करून दिली आहे. या योजनेनुसार कोणतीही व्यक्ती 18 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला वय वर्षं 60 असतानाच 1000 ते 5000 हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन सुरू होते. परंतु या योजनेतून मिळणारा परतावा हा गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीवर अवलंबून असतो.अटल पेन्शन योजनेत तीन पर्याय दिलेले आहेत. ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला मासिक, तिमाही आणि सहा महिन्यांसाठी गुंतवणुकीचे पर्याय मिळतात. अशातच तुम्ही 84 रुपये प्रतिमहिना गुंतवणूक केल्यास 60 वर्षांच्या वयात तुम्हाला 2000 रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळते. म्हणजेच तुम्ही वय वर्षं 18 असताना या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात केल्यास 60 वर्षांच्या वयात तुम्हाला 24 हजार रुपये वर्षाला पेन्शन मिळते.केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजनेचे फॉर्म सर्व बँकांच्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीनं उपलब्ध आहेत. हे फॉर्म भरून बँकेत जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर तुमचं अटल पेन्शन योजनेचं खातं उघडणार आहे. थोडी थोडी गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा फायदा मिळवून देते. 

टॅग्स :सरकारी योजनापैसा