Join us

गोल्ड बॉन्ड, ईटीएफ किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक केलीये? पाहा किती द्यावा लागेल इन्कम टॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 2:38 PM

सोन्यात गुंतवणूक हा नेहमीच चांगला पर्याय मानला जातो. भारतात लग्न समारंभात किंवा सणासुदीला सोनं खरेदी केलं जातं

सोन्यात गुंतवणूक हा नेहमीच चांगला पर्याय मानला जातो. भारतात लग्न समारंभात किंवा सणासुदीला सोनं खरेदी केलं जातं. सोनं तुम्हाला बाजारातील अस्थिरतेपासूनही वाचवतं. त्यामुळे तज्ज्ञ तुमच्या पोर्टफोलिओपैकी १० ते १५ टक्के सोन्यात गुंतवण्याची शिफारस करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्हाला सोन्याच्या गुंतवणुकीवर किती इन्कम टॅक्स लागतो आणि आयटीआर भरताना तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता?

सोन्यात गुंतवणूक अनेक प्रकारे केली जाऊ शकते, जसं की सॉवरेन गोल्ड बॉन्ड, सोन्याचे दागिने किंवा गोल्ड बार आणि गोल्ड ईटीएफ इत्यादी. आता गुंतवणुकीवर कोणताही कर नाही. परंतु जर तुम्ही त्यांची विक्री करून त्यावर नफा मिळवल्यास तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल असेट्स म्हणून कर भरावा लागेल. आता नियम काय म्हणतात ते जाणून घेऊया

किती लागतो टॅक्सतुम्ही सोन्याचे दागिने किंवा नाणी यांसारखं काही ३६ महिन्यांहून अधिक काळ तुमच्याकडे ठेवल्यास ते दीर्घकालीन भांडवली मालमत्ता क्लासमध्ये येतं. दुसरीकडे, ३१ मार्च २०२३ पूर्वी गोल्ड सेव्हिंग्ज फंड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये खरेदी केलेली युनिट्स देखील असेट्सच्या कक्षेत येतात, तर हे पर्याय ३६ महिन्यांहून अधिक काळ ठेवल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीखाली येतात.

त्यामुळे ३६ महिन्यांनंतर त्यांची विक्री करून नफा मिळतो. याला लांग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. इंडेक्सेशन नंतर, या नफ्यावर फ्लॅट 20 टक्के कर आकारला जातो. तुम्ही हा नफा ३६ महिन्यांपूर्वी काढून घेतल्यास, त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून कर आकारला जातो. तुम्ही ३१ मार्च २०२३ नंतर गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड सेव्हिंग्ज फंडात गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच तुमच्या नफ्यावरील कर फिक्स्ड डिपॉझिटीनुसार मोजला जाईल.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड टॅक्स-फ्रीसॉवरेन गोल्ड बाँडवर २.५० टक्के दरानं व्याज दिलं जातं. ते दर सहा महिन्यांनी तुमच्या बँक खात्यात जमा होतं. अशा परिस्थितीत, सॉवरेन गोल्ड बॉन्डवर मिळणारं व्याज पूर्णपणे करपात्र असतं. दुसरीकडे, गोल्ड बॉन्ड आठ वर्षांनी रिडीम केले जातात, त्यामुळे तुम्हाला मिळणारा नफा पूर्णपणे करमुक्त असतो. इन्कम टॅक्स दाखल करताना तुम्हाला सोन्यावरील खरेदी विक्रीतून होणारं इन्कम हे इन्कम फ्रॉम अदर सोर्स कॉलममध्ये दाखवावं लागतं.

टॅग्स :सोनंइन्कम टॅक्स