Join us

Invest in Gold: सोने पुन्हा 52000 पार जाणार? लग्नसराईआधी जाणून घ्या संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 10:33 AM

Gold Rate Hike: जेव्हा जेव्हाअशी परिस्थिती आली आहे, तेव्हा तेव्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आताही गुंतवणूकदार शेअरमधून पैसे काढून ते सोन्याकडे वळवू लागले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. 

कोरोना आणि सोने हे समीकरण गेल्या दोन वर्षांपासून पक्के झाले आहे. कोरोना वाढू लागला की सोन्याची किंमत वाढते, एवढी की कोणी विचारही केला नसेल एवढा उच्चांक झाला आहे. कोरोना कमी झाला की सोन्याची किंमत कमी होऊ लागते. आता पुन्हा जगभरात कोरोनाची लाट आली आहे. यामुळे पुन्हा सोन्याचे दर वाढणार का असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीचा मार्ग शोधत आहेत. शेअर बाजारातील घसरण देखील याकडेच बोट दाखवत आहे. अशी जेव्हा जेव्हा परिस्थिती आली आहे, तेव्हा तेव्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आताही गुंतवणूकदार शेअरमधून पैसे काढून ते सोन्याकडे वळवू लागले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. 

सोन्याचा हा तेजीचा कल पाहता, गुंतवणूकदारांमुळे त्याची किंमत झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने सोन्याची मागणीही वाढणार असून, त्यामुळेही किंमत वाढू शकते.मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितले  की, बाजारातील तेजीमुळे येत्या १२ ते १५ महिन्यांत सोन्याची खरेदी वाढू शकते आणि त्यामुळे सोन्याची किंमत प्रति औंस $२,००० (सुमारे 1.48 लाख रुपये) झाली आहे. यामुळे सोने नवीन उच्चांक गाठू शकते. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम. त्यानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,500 रुपयांच्या वर जाऊ शकते.

२०२१ मध्ये सोन्याचा दर...2021 मध्ये सोन्याच्या किमतीत सुमारे 4% घट झाली होती. तो प्रति औंस $1806 (सुमारे 1.34 लाख रुपये) वर बंद झाला. सध्या भारतीय बाजारात सोन्याचा भाव 48,535 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर डॉलरमध्ये त्याची किंमत $1,840 (सुमारे 1.36 लाख रुपये) प्रति औंस आहे. 

टॅग्स :सोनंकोरोना वायरस बातम्या