Join us

१५ वर्षे पैसे गुंतवल्यास मिळतील १ कोटी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा; व्याजापोटी कमवाल ७३ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:18 PM

पैसा कमावण्यापेक्षा तो वाढवणं अधिक कठीण काम आहे. पैशांचं मॅनेजमेंट करणं सोपी गोष्ट नाही.

How to become Crorepati : पैसा कमावण्यापेक्षा तो वाढवणं अधिक कठीण काम आहे. पैशांचं मॅनेजमेंट करणं सोपी गोष्ट नाही. परंतु सुरुवात कुठून करावी हा प्रश्न सर्वांसमोर असतो. अशात १५*१५*१५ चा नियम अतिशय कामी येतो. हा पैसा वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा नियम तुमच्या पैशाला तीन भागांमध्ये विभागतो. गुंतवणूक, कालावधी आणि व्याज. याचाच अर्थ १५ वर्षांसाछी १५ वर्षांसाठी १५ टक्के व्याज. तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर तुम्ही नक्कीच कोट्यधीश (How to become crorepati) बनू शकता. याच्या मागे कामी येतो तो म्हणजे कम्पाऊंडिंगचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तेव्हाच कामी येतो जेव्हा तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करता. 

पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगमूळ गुंतवणूकीवर व्याजदोन्ही रकमेवर पुन्हा व्याजाचा फायदागुंतवणूक+व्याज+व्याज+व्याज=कम्पाऊंडिंग

१५*१५*१५ चा फॉर्म्युला वापरागुंतवणूक - १५००० रुपयेकालावधी - १५ वर्षेव्याज - १५ टक्केफंड - १५ वर्षांनंतर १ कोटी रुपयेएकूण गुंतवणूक - २७ लाखकम्पाऊंडिंग - ७३ लाख रुपये व्याजातून कमाई

२० वर्षांपर्यंत गुंतवणूकजर तुम्ही म्युच्युअल फंडासोबत एसआयपी केली, तर त्याची सुरुवात १० हजार रुपयांपासून करा. सामान्यपणे यात १२ टक्के रिटर्न मिळतात. या ठिकाणी तुम्हाला २० वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. २० वर्षांत तुमची गुंतवणूक २४ लाख रुपये होईल. परंतु यावर जे व्याज मिळेल ते ७४.९३ लाख रुपये असेल. याचाच अर्थ या ठिकाणी पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगनं काम केलं. एसआयपीचं एकूण मूल्य ९८.९३ लाख रुपयांवर पोहोचेल. तुम्हाला यावर एकूण ७४.९३ लाख रुपयांचं व्याज मिळेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :गुंतवणूकपैसा