Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC च्या 'या' स्कीममध्ये एकदाच करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळत राहील पेन्शन

LIC च्या 'या' स्कीममध्ये एकदाच करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळत राहील पेन्शन

LIC New Jeevan Shanti : एलआयसीच्या या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या दर महिन्याच्या पेन्शनची व्यवस्था करू शकता. पाहा किती करावी लागेल गुंतवणूक.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:20 PM2023-03-27T14:20:13+5:302023-03-27T14:23:32+5:30

LIC New Jeevan Shanti : एलआयसीच्या या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या दर महिन्याच्या पेन्शनची व्यवस्था करू शकता. पाहा किती करावी लागेल गुंतवणूक.

Invest once in this scheme of LIC jeevan shanto pension will continue to be received every month know how much to invest | LIC च्या 'या' स्कीममध्ये एकदाच करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळत राहील पेन्शन

LIC च्या 'या' स्कीममध्ये एकदाच करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळत राहील पेन्शन

LIC New Jeevan Shanti : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) सर्वच वयोगटातील लोकांसाठी योग्य स्कीम्स आहेत. एलआयसी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या गुंतवणुकीसाठी आपली योजना ऑफर करते. साधारणपणे LIC मध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. एलआयसीच्या अनेक स्कीम्स खूप लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून लोकांना चांगला परतावा मिळू शकतो. LIC ची अशीच एक योजना म्हणजे नवीन जीवन शांती पॉलिसी (New Jeevan Shanti Policy). यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेऊ शकता. एलआयसीच्या या योजनेत तुम्ही मर्यादित गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता.

एन्युटी प्लॅन आहे ही पॉलिसी
एलआयसीची न्यू जीवन शांती स्कीम एक एन्युटी प्लॅन आहे. याचा अर्थ असा की पॉलिसी खरेदी करताना तुमच्यासाठी पेन्शनची रक्कम फिक्स केली जाते. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पेन्शनची सुविधा मिळते. या अंतर्गत तुम्हाला दोन पर्याय मिळतात. पहिला डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाईफ आणि दुसरा डेफर्ड एन्युटी फॉर जॉईंट लाईफ. पहिल्या प्लॅन अंतर्गत एकाच व्यक्तीसाठी तुम्ही पेन्शन घेऊ शकता.

इतकी करावी लागेल गुंतवणूक
३० ते ७९ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान १.५ लाख रुपये गुंतवावे लागतील. तथापि, जर तुम्हाला पॉलिसी आवडली नाही, तर तुम्ही ती कधीही सरंडर करू शकता. याशिवाय ही पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते.

नॉमिनीला मिळते जमा रक्कम
जर एखाद्यानं सिंगल पॉलिसी खरेदी केली असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर जमा रक्क त्यांच्या नॉमिनीला मिळेल. जर पॉलिसी होल्डर हयात असेल तर त्याला ठराविक मर्यादेनंतर पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल. जर तुम्ही जॉईंट पॉलिसी घेतली असेल आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर पेन्शनची सुविधा दुसऱ्या व्यक्तीला मिळेल. जर दोघांचाही मृत्यू झाला तर पैसे नॉमिनीला मिळतील.

१० लाखांच्या गुंतवणूकीवर पेन्शन
सिंगल लाईफसाठी डिफर्ड एन्युटीमध्ये १० लाखांची पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला ११,१९२ रुपयांचे दर महिन्याला पेन्शन मिळतं. तर तुम्ही १.५ लाखांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला महिन्याला १००० रुपये पेन्शन मिळेल. तुम्ही गरजेनुसार पेन्शन महिन्याला, तिमाही, सहामाही आधारावर घेऊ शकता. पेन्शनची सुरुवात त्वरितही होऊ शकते किंवा १ वर्ष ते २० वर्षांच्या दरम्यान कधीही होऊ शकते.

Web Title: Invest once in this scheme of LIC jeevan shanto pension will continue to be received every month know how much to invest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.