Join us  

फक्त एकदा 5000 रुपयांची करा गुंतवणूक, दर महिन्याला होईल 50 हजारांची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 5:22 PM

Kulhad making business: भारतात मोठ्या प्रमाणात चहा प्यायली जाते. त्यातच कुल्हड चहा (Kulhad making business)  फारच प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देरेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हड चहाची वारंवार मागणी असल्याचे पाहायला मिळते.मोदी सरकारने कुल्हड चहाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही छोटासा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक कमी गुंतवणूकीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून दर महिन्याला तुम्हाला चांगली कमाई करता येईल. भारतात मोठ्या प्रमाणात चहा प्यायली जाते. त्यातच कुल्हड चहा (Kulhad making business)  फारच प्रसिद्ध आहे. (invest only 5k and get 50000 rupees profit by kulhad making business)

रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हड चहाची वारंवार मागणी असल्याचे पाहायला मिळते. अशावेळी तुम्ही कुल्हड चहा तयार करणे आणि विकण्याचा व्यवसाय करू शकता. सरकार सध्या कुल्हड चहाची मागणी वाढविण्याकडे लक्ष देत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ता आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडमधून चहा देण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन देण्यासाठी प्लॅस्टिक आणि कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

सरकारकडून प्रोत्साहनमोदी सरकारने कुल्हड चहाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार कुंभारांना विजेवर चालणारे चाक देते. त्यावरून ते मातीची भांडी तयार करू शकतात. त्यानंतर सरकार कुंभारांकडून ते कुल्हड चांगल्या किमतीत खरेदी करतात.

पाच हजार रुपयांची गुंतवणूक करू शकताविशेष म्हणजे, हा व्यवसाय फारच कमी गुंतवणूक करून सुरू करता येतो. यासाठी आपल्याला छोट्या जागेसह 5 हजार रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या माहितीनुसार, यंदा सरकार 25 हजार इलेक्ट्रिक चाक वितरीत करणार आहे. 

किती रुपयांपर्यंत विकू शकता?कुल्हडमधील चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही ती सुरक्षित असते. चहाच्या कुल्हडची किंमत सुमारे 50 रुपये आहे. तसेच, लस्सी कुल्हारची किंमत दीडशे रुपये आहे, दुधाच्या कुल्हडची किंमत 100 रुपये ते दीडशे रुपये आहे. मागणी वाढल्यास चांगली किंमत मिळण्याचीही शक्यता आहे.

चांगले उत्पन्न मिळू शकतेआजच्या काळात शहरांमध्ये कुल्हडच्या चहाची किंमत 15 ते 20 रुपये असते. जर व्यवसाय योग्य पद्धतीने करायचा ठरवल्यास कुल्हडमधून चांगले उत्पन्न मिळू शकते. 1 दिवसात जवळपास 1 हजार रुपयांची बचत करता येऊ शकते.

टॅग्स :व्यवसायपैसा