Post Office Public Provident Fund : आजही मोठ्या संख्येने लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत आहेत. याचे उत्तम कारण म्हणजे चांगल्या परताव्यासह उपलब्ध सुरक्षा. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही काही पोस्ट ऑफिस योजनांपैकी एक आहे जी उत्कृष्ट परतावा देत आहे. या व्यतिरिक्त, या योजनेतील जोखीम जवळजवळ नगण्य आहे. आपण पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
अशा प्रकारे व्याज मोजलं जातं
समजा तुम्ही या योजनेत ५०० रूपयांचा पहिला हप्ता जमा केला, ज्यावर तुम्हाला ३० रुपये व्याज मिळाले. तर पुढच्या वर्षी तुम्हाला ५३० रूपयांवर व्याज दिलं जाईल. वर्षानुवर्षे पैसे असेच वाढत राहतील. या योजनेअंतर्गत गुंतवणूकीचे पैसे, व्याजाचे पैसे आणि मुदतपूर्तीचे पैसे पूर्णपणे व्याजमुक्त असतात. या योजनेत पैसे गुंतवल्यास इन्कम टॅक्सच्या सेक्शन ८० सी अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. या योजनेत तुम्हील ५०० रूपयांनी गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु वर्षभरात सर्वाधिक १.५ लाखांपर्यंतच रक्कम जमा करू शकता. ही योजना १५ वर्षांसाठी आहे. यामध्ये जर तुम्ही मधूनच पैसे काढू इच्छित असाल तर तसं तुम्हाला करता येणार नाही. १५ वर्षांनंतर तुम्हाला दर ५ वर्षांसाठी ही स्कीम वाढवता येऊ शकते.
जर ५०० रूपयांचीं गुंतवणूक केली
जर तुम्ही दर महिन्याला ५०० रूपये गुंतवले, तर १५ वर्षांसाठी तुम्हाला ९० हजार रूपये जमा करावे लागतात. यानंतर १५ वर्षांनी तुम्हाला १,१५,७८४ रूपये मिळतील.