Lokmat Money > बिझनेस न्यूज > 200 रुपये गुंतवा अन् मिळवा 34 लाख, सरकारची अनोखी योजना

200 रुपये गुंतवा अन् मिळवा 34 लाख, सरकारची अनोखी योजना

ब-याचदा महिन्याच्या पगारात सर्व घर खर्च भागवावा लागतो. त्यामुळे पैशांची बचत अशी होतच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 04:23 PM2018-09-06T16:23:05+5:302018-09-06T16:23:30+5:30

ब-याचदा महिन्याच्या पगारात सर्व घर खर्च भागवावा लागतो. त्यामुळे पैशांची बचत अशी होतच नाही.

Invest Rs 200 and get 34 lakh, the government's unique plan | 200 रुपये गुंतवा अन् मिळवा 34 लाख, सरकारची अनोखी योजना

200 रुपये गुंतवा अन् मिळवा 34 लाख, सरकारची अनोखी योजना

नवी दिल्ली- ब-याचदा महिन्याच्या पगारात सर्व घर खर्च भागवावा लागतो. त्यामुळे पैशांची बचत अशी होतच नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का, अशा काहीही छोट्या छोट्या योजना आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं खातं उघडावं लागणार आहे. ज्या लोकांना महिन्याच्या बजेटमधून पैशांची बचत करणं अवघड जातं, त्यांच्यासाठी पीपीएफ हा चांगला पर्याय आहे. 

पीपीएफसाठी तुम्ही दररोज 50 आणि 100 रुपये वाचवून मोठी रक्कम जमा करू शकता. कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देण्यासाठी पीपीएफ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी पीपीएफसंदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडा(पीपीएफ)च्या खात्यात जमा केलेली छोटी रक्कम मोठा फायदा मिळवून देते. त्यासाठी दररोज तुम्हाला 200 रुपये वाचवून या योजनेत पैसे गुंतवावे लागतील. 20 वर्षांनंतर गुंतवलेल्या 200 रुपयांचे कधी 34 लाख रुपये होतील हे समजणार नाही. तुम्हाला दररोज 200 रुपये गुंतवल्यानंतर 20 वर्षांनी व्याजासह 34 लाख रुपये मिळतील.  

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडा(पीपीएफ)चे फायदे- पीपीएफ योजनेंतर्गत गुंतवलेल्या पैशांची तुम्हाला हमी मिळते. या योजनेतून मिळणा-या परताव्याच्या फायद्यावर कोणताही टॅक्स लावला जात नाही. तसेच यात नॉमिनीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पीपीएफ अकाऊंट पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या निवडक शाखेतही उघडता येते. याची मर्यादा 15 वर्षांपर्यंत असून, ते 5 वर्षांसाठी वाढवता येते. 
100 रुपयांमध्ये उघडू शकता खातं- पीपीएफमध्ये तुम्ही 100 रुपयांत खातं खोलू शकता. परंतु त्यासाठी आर्थिक वर्षांत कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. वर्षभरात तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. पीपीएफसाठी सरकार व्याजदर प्रत्येक वेळी निश्चित करत असते. जानेवारी 2018पासून पीपीएफ अकाऊंटवर 7.6 टक्के व्याज मिळतं.   
कसे तयार होतात 34 लाख- तुम्ही दररोज या योजनेत 200 रुपये गुंतवल्यानंतर महिन्याभरात 6000 रुपये गुंतवणूक होते. अशा प्रकारे तुमचे वर्षाला 72000 रुपये बचत होतात. 
तुम्ही असे 15 वर्षं पैसे गुंतवल्यास तुमच्या खात्यात 10,80,000 रुपये जमा होतील. तसेच या योजनेत 5 वर्षांची वाढ करण्याची सुविधा आहे. असं केल्यास 20 वर्षांत तुमच्या खात्यात जवळपास 14,40,000 रुपये जमा होणार आहेत. पीपीएफमध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळतं. 20 वर्षांपर्यंत व्याजाचा दर कायम राहिल्यास तुम्हाला 33.92 लाख रुपयांचा परतावा मिळतो. तुम्हाला तुमच्या पैशावर जवळपास 19.52 लाख रुपयांचं निव्वळ व्याज मिळते. 
कमी वयात मिळवून देतो जास्त नफा- जर तुम्ही 25 वर्षांच्या वयात असतानाच दररोज 200 रुपये गुंतवल्यास तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. वर्य वर्षं 45व्या वयात तुम्हाला 34 लाख रुपयांचा फायदा मिळवून देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नोकरी करता करता स्वतःच्या गरजाही पूर्ण करू शकता. दररोज 200 रुपयांची गुंतवणूक करणं फार कठीण नाही. 

Web Title: Invest Rs 200 and get 34 lakh, the government's unique plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा