Lokmat Money > बिझनेस न्यूज > Atal Pension Yojana : दरमहा २१० रुपये गुंतवा, ५ हजारांची पेन्शन पक्की, जाणून घ्या योजनेबद्दल सर्व काही...

Atal Pension Yojana : दरमहा २१० रुपये गुंतवा, ५ हजारांची पेन्शन पक्की, जाणून घ्या योजनेबद्दल सर्व काही...

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण वय वर्ष १८ ते ४० या कालावधीत गुंतवणूक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 12:46 AM2022-08-15T00:46:45+5:302022-08-15T00:52:19+5:30

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण वय वर्ष १८ ते ४० या कालावधीत गुंतवणूक करू शकता.

Invest Rs 210 per month, pension of Rs 5 thousand guaranteed, know everything about the atal pension Yojana | Atal Pension Yojana : दरमहा २१० रुपये गुंतवा, ५ हजारांची पेन्शन पक्की, जाणून घ्या योजनेबद्दल सर्व काही...

Atal Pension Yojana : दरमहा २१० रुपये गुंतवा, ५ हजारांची पेन्शन पक्की, जाणून घ्या योजनेबद्दल सर्व काही...

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसात मिळत आहे. आतापर्यंत या योजनेची सदस्य संख्या जवळपास ४ कोटींपेक्षाही अधिक झाली आहे. पेन्शन फंड नियामकानुसार, (पीएफआयडीए) गेल्या आर्थिक वर्षांत ९९ लाखांपेक्षाही अधिक अटल पेन्शन योजनेची खाती उघडली गेली आहेत. वृद्धापकाळात पेन्शन मिळावी यासाठी, या योजनेत किमान २० वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, आपले वय जेवढे आहे, त्यावरुनच आपल्याला किती पेन्शन मिळू शकते? हे निश्चित होते. याशिवाय, या योजनेत गुंतवणूक केल्यास १.५० लाखापपर्यंत आपल्याला कर सवलतही मिळते.

अशी करा गुंतवणूक... -
अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण बँकेत जाऊनही या पेन्शन योजनेचे खाते उघडू शकतात. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर आपल्याला एक कन्फर्मेशन मेसेज येईल. यानंतर, आपल्या वयानुसार आपले मासिक योगदान ठरेल.   त्यानंतर वयानुसार तुमचे मासिक योगदान ठरेल. या योजनेत, वयाच्या ६० वर्षांनंतर आपल्याला १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. यासाठी संबंधित सदस्याला ४२ ते २१० रुपयांपर्यंतची मासिक गुंतवणूक करावी लागते.

अशी मिळेल अधिक पेन्शन -
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण वय वर्ष १८ ते ४० या कालावधीत गुंतवणूक करू शकता. यात किमान २० वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे बचत खाते, आधार आणि सक्रिय मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. या योजनेत, जेवढे अधिक योगदान आपण करू शकाल, आपल्याला तेवढीच अधिक पेन्शन मिळेल.

१.५ लाख रुपयांपर्यंतची कर सवलत -
या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या ८० सी कलमान्वये १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सवलतही मिळते. गुंतवणूकदारांस हप्ते भरण्यासाठी मासिक, तिमाही अथवा सहामाही, असे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, बचत खात्यावरून पैसे ऑटो-डेबिट होतात. अटल पेन्शन योजनेचे खाते ऑनलाईन पद्धतीने उघडता येते. एसबीआयमध्ये खाते असल्यास नेट बँकिंगच्या माध्यमानेही या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते उघडता येते.

ऑनलाईन खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम एसबीआयला लॉगईन करा. यानंतर, ई-सर्व्हिसेसवर क्लिक करा. आता समोर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये ‘सोशल सेक्युरिटी स्कीम’वर क्लिक करा. त्यातील ३ पर्यायांपैकी ‘एपीवाय’ पर्यायावर क्लिक करा. यानंतर, आपला अकाऊंट नंबर, नाव, वय व पत्ता टाका. पेन्शन पर्यायांपैकी ५ हजार अथवा १ हजार याची निवड करा. यानंतर तुमच्या वयानुसार तुमचे मासिक योगदान ठरेल.
 

Web Title: Invest Rs 210 per month, pension of Rs 5 thousand guaranteed, know everything about the atal pension Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.