Join us

फक्त 291 रुपयांची रोजची गुंतवणूक तुम्हाला हमखास बनवेल करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:47 AM

नोकरी करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नेहमी कोणत्या योजनेत पैसे गुंतवल्यास काही काळात मोठा परतावा देईल, असा प्रश्न घोंगावत असतो.

नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नेहमी कोणत्या योजनेत पैसे गुंतवल्यास काही काळात मोठा परतावा देईल, असा प्रश्न घोंगावत असतो. जर तुम्ही भविष्यातील गरजांच्या पूर्ततेसाठी 1 कोटींच्या आसपास फंड जमा करायचा असल्यास एक अफलातून य़ोजना आहे. रोज 291 रुपये गुंतविल्यास फायद्याचे ठरणार आहे. 

बाजारात उपलब्ध असलेल्या गुंतवणूक योजनांमध्ये इक्विटी म्युचुअल फंडाला सर्वात वेगाने गुंतवणुकीला वाढविणारा समजला जातो. मात्र, ही गुंतवणूक जास्त जोखमीचीही असते. असे असले तरीही हा फंड लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीपेक्षा खूप लवकर रिटर्न देतो. जर तुम्हाला काहीशी जोखीम घेऊन कमी वेळेत मोठा फंड जमा करायचा असल्यास हा चांगला पर्याय आहे. म्युचुअल फंडामध्ये गुंतवणुसाठी SIP हा चांगला पर्याय आहे. 

जर तुम्ही तुमची गुंतवणूक मोठ्या फंडमध्ये बदलू इच्छित असाल तर जास्त अवधीची योजना निवडावी लागेल. तसेच पगार वाढ होत असताना त्याचबरोबर गुंतवणूकीची रक्कमही वाढविली पाहिजे. यासाठी आधीच लक्ष्य निर्धारित करणे फायद्याचे ठरेल. यानंतरच गुंतवणुकीस सुरुवात करावी. 

इक्विटी म्युचुअल फंडांकडून ऐतिहासिक परतावा?मोठ्या अवधीच्या इक्विटी म्युचुअल फंडापेक्षा कोणताही पर्याय तुम्हाला जास्त रिटर्न देत नाही. ती सोन्यातील गुंतवणूक असेल किंवा रियल इस्टेटमधील. जर तुम्ही मिराए असेट इमर्जिंग ब्लूचिप फंडाच्या परताव्याकडे पाहाल तर या फंडाने गेल्या तीन वर्षांत 21.35 टक्के रिटर्न दिला आहे. मिराए असेट्स इंडिया इक्विटी फंड-डायरेक्ट प्लानने 19.59, कॅनरा रोबेरो इमर्जिंग इक्विटास फंडाने 19.55 टक्के रिटर्न, इन्वेइस्को इंडिया कॉन्ट्रा फंड-डायरेक्ट प्लानने 19.35, कोटक इंडिया ईक्यू कॉन्ट्रा फंड-डायरेक्ट प्लानने 19.24 टक्के एवढा परतावा दिला आहे. तर 10 वर्षांच्या गुंतवणुकीची पडताळणी केल्यास मिराए असेट इमर्जिंग ब्लूचिप फंडाने 26.71 टक्के, एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने 24.23 टक्के आणि प्रिंसिपल इमर्जिंग ब्लूचिप फंडाने 23.11 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 

रोज 291 रुपयांची गुंतवणूक?जर तुम्ही रोज 291 रुपयांची बचत करू शकत असाल तर 20 वर्षांत करोडपती बनू शकणार आहात. यासाठी 13 टक्के परतावा गृहीत धरण्यात आला आहे. 291 रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रतिदिनच्या हिशोबाने महिन्याला 8730 रुपये गुंतवणूक होणार आहे. यावर 13 टक्के वार्षिक परतावा धरल्यास 20 वर्षांत 1 कोटी रुपये मिळतील.

टॅग्स :पैसाव्यवसायनिधी