नवी दिल्ली : दोन वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्यांमधील संघर्षाला काही आठवडे उलटले असतानाच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी तपास संस्थांनी नि:पक्षपातीपणे काम करावे, असे आवाहन केले आहे. तपास सुरू होताच माध्यमांना माहिती देण्याचा मोह तपास अधिकाºयांनी टाळला पाहिजे, असेही जेटली यांनी म्हटले आहे.महसुली गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीआरआय) ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जेटली यांनी सांगितले की, डीआरआयने तपासात सर्वोच्च पातळीवरील सचोटी, व्यवसायात्मक दर्जा (प्रोफेशनल स्टँडर्ड) आणि जवळपास संपूर्ण दोषरहित तपास संस्था असण्याचा लौकिक टिकवायला हवा. देशातील सर्वात मोठे नेटवर्क असलेली तपास संस्था पोलीस आणि इतर संस्थांकडे मी जेव्हा पाहतो, तेव्हा डीआरआय ही वादांपासून सर्वाधिक मुक्त असलेली संस्था म्हणून समोर येते.जेटली यांनी तपास संस्थांसाठी काही आवश्यक तत्त्वे भाषणातविशद केली. ते म्हणाले की, सर्वोच्च पातळीवरील व्यवसायात्मकता (प्रोफेशनॅलिझम) आणि गुन्हा उघडकीस आणणे हा एकमेव उद्देश ही दोन तत्त्वे तपास संस्थांसाठी प्रमुख आहेत.कोणाही निष्पाप व्यक्तीला इजा पोहोचणार नाही, अथवा त्याचाछळ होणार नाही, याची खबरदारी तपास अधिकाºयांनी घ्यायलाहवी. त्याचवेळी कोणीही दोषी सुटणार नाही, याकडेही लक्षद्यायला हवे. तपास प्रारंभिक पातळीवर असतानाच फार गाजावाजा करण्याचा आणि मीडियाकडेधाव घेण्याचा मोह तपास अधिकाºयांनी टाळायला हवा. त्याऐवजी त्यांनी तपास प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून पुरावे अधिकाधिक मजबूत करायला हवेत.>तपास अधिकारी असावा ‘फेसलेस’२२जेटली म्हणाले की, अंतिमत: गुन्हेगारांना शासन होते का, यावरच तपास संस्थेची खरी परीक्षा होते. तपास अधिकारी चेहराविहीन (फेसलेस) असावा. माध्यमे आणि बातम्यांत तुम्ही जितके कमी असाल, तितके चांगले आहे. तपास संस्थांसाठी कोणतीही बातमी ही चांगली नसते. सुरुवातीच्या यशाचा गवगवा करणे आणि अंतिमत: आरोप सिद्ध न होणे, यातून तपास संस्थांच्या लौकितात कोणतीच भर पडत नाही.
तपास संस्थांनी नि:पक्षपातीपणा जपावा; माध्यमांना माहिती देण्याचा मोह टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:38 AM