नवी दिल्ली : तपास यंत्रणांना जर एकाच प्रकरणाची माहिती जर रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर खाते, सेवा कर विभाग, अशा विविध विभागांकडून हवी असेल तर सध्या त्याचा विशिष्ट असा फॉरमॅट नाही. परिणामी तपास यंत्रणांना माहिती मिळण्यास किंवा ती माहिती मिळाली तरी त्याचा तपासासाठी वापर करण्यास होत असलेली अडचण लक्षात घेता, आता सर्वच आस्थापनांसाठी एक विशिष्ट फॉरमॅट तयार करण्याचे काम सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणा, तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषणला अनेक प्रकरणांमध्ये मिळालेली माहिती वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये मिळाल्याने वाचण्यात अडचणी आल्या. त्यामुुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. करविषयक विभागांपेक्षा बँकांकडून, त्यातही प्रत्येक बँकेचा माहिती देण्याचा फॉरमॅट वेगळा असल्याने त्याची छाननी करताना तपास यंत्रणांना डोकेदुखी होते. यामुळे वेळेचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेख होत असल्याने व्यवहाराचे स्वरूप ओळखणे अवघड जात आहे.
‘तपास यंत्रणांना बँकांनी माहिती फॉरमॅटमध्येच द्यावी’
तपास यंत्रणांना जर एकाच प्रकरणाची माहिती जर रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर खाते, सेवा कर विभाग, अशा विविध विभागांकडून हवी असेल तर सध्या त्याचा विशिष्ट असा फॉरमॅट नाही.
By admin | Published: July 6, 2015 10:43 PM2015-07-06T22:43:27+5:302015-07-06T22:43:27+5:30