मुंबई/ नवी दिल्ली : नीरव मोदी समूहाच्या ४४ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि शेअर सक्तवसुली संचालनालयाने (र्ईडी) शुक्रवारी गोठविले. त्याने आयात केलेली महागडी घड्याळे जप्त केली आणि त्याच्या पत्नी अमी हिलाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र मोदी व चोकसीविरुद्ध अनेक लोकांनी फसवणुकीच्या तक्रारी करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काहीच कारवाई का केली नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
मोदीवरील कारवाई मनी लाँड्रिंग कायद्यान्वये केली आहे. त्याची बँक खात्यातील रक्कम ३० कोटी रुपये असून शेअर्सची किंमत १३.८६ कोटी रुपये आहे. या रकमेच्या व शेअर्सच्या देवाण-घेवाणीवर बंदी घालण्यात आले आहेत. गेल्या एका आठवड्यात नीरव मोदीच्या संबंधित ठिकाणांवरुन ईडीने तपासात महागडे घड्याळे, बॉक्सेस, १७६ कपाटे आदी वस्तू जप्त केल्या.
ईडीने गुरुवारी या समूहाच्या बँक खाते, शेअर आणि लक्झरी कारच्या जप्तीतून अंदाजे १०० कोटी रुपयांची संपत्ती सील केली आहे. ईडी व अन्य यंत्रणा नीरव मोदी, त्याचे मामा व गीतांजली जेम्सचे मेहुल चोकसी यांच्याविरुद्ध तपास करत आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीनंतर ११,४०० कोटी रुपयांचे हे प्रकरण समोर आले आहे.
कोठारी पिता-पुत्रांना कोठडी
रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी व त्याचा मुलगा पुत्र राहुल यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाचा ट्रांझिट रिमांड सुनावला. त्यांना लखनौला नेण्यासाठी सीबीआयने ट्रांझिट रिमांडची विनंती केली होती. या पिता-पुत्रांना ३,६९५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी अटक झाली आहे. न्या. समर विशाल यांच्यासमोर दोघांना उभे करण्यात आले होते. सीबीआयने दोन दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने एक दिवसांचा रिमांड दिला. सीबीआयने विक्रम कोठारी, पत्नी साधना आणि मुलगा राहुल यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे.
४४ कोटींच्या ठेवी, शेअर गोठविले, नीरव मोदीच्या पत्नीचीही चौकशी
नीरव मोदी समूहाच्या ४४ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि शेअर सक्तवसुली संचालनालयाने (र्ईडी) शुक्रवारी गोठविले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:32 AM2018-02-24T03:32:25+5:302018-02-24T03:32:25+5:30